वाळूज रेग्युलर ..२
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:09+5:302015-02-14T23:52:09+5:30
वाळूजच्या ग्रामसेवकास कार्यमुक्त करून चौकशीचे आदेश

वाळूज रेग्युलर ..२
व ळूजच्या ग्रामसेवकास कार्यमुक्त करून चौकशीचे आदेशवाळूज महानगर- बदलीच्या आदेशाचे पालन न करता ग्रामपंचायतीचा पदभार सोडण्यास टाळाटाळ करणार्या वाळूजच्या ग्रामसेवकास कार्यमुक्त करून त्याची चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांना दिले आहे.तीन वर्षांपूर्वी ग्रामसेवक एन. के. वाघमारे यांची प्रभारी ग्रामसेवकपदी नियुक्ती पंचायत समितीच्या वतीने करण्यात आली होती. या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकार्याची पदस्थापना असताना त्यांना नियमबाह्यपणे या ग्रामपंचायतीचा पदभार सोपविण्यात आला होता. या निर्णयाच्या विरोधात ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच नागरिकांनी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करूनही ग्रामसेवक वाघमारे यांची बदली करण्याची मागणी केली होती. मात्र, राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्यांची आतापर्यंत बदली झालेली नव्हती. गत महिन्यात प्रशासनाच्या वतीने वाळूजला ग्रामविकास अधिकार्यांचे पद रिक्त असल्यामुळे या ठिकाणी एस.सी.लव्हाळे या ग्रामविकास अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. बदली होऊनही ग्रामसेवक वाघमारे हे ग्रामविकास अधिकारी लव्हाळे यांना पदभार देण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे मनसेचे वाळूज शहराध्यक्ष सचिन काकडे पाटील यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांची भेट घेऊन ग्रामसेवकास कार्यमुक्त करण्यास टाळाटाळ केल्याने उपोषणाचा इशारा दिला होता.