शेतकरी प्रतिक्षेत
By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:22+5:302015-02-14T23:50:22+5:30
निवघा बाजार : लाभार्थी शेतकर्यांच्या निधीच्या याद्या प्रसिद्ध होवून महिना लोटला तरी अद्याप वाटपास सुरुवात झाली नसल्याने शेतकरी प्रतिक्षेत आहेत. या बाबत मंडळ अधिकारी कोथळकर यांना विचारणा केली असता शेतकर्यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या परंतु या याद्यामध्ये बर्याच शेतकर्यांची नावे आले नसल्याने त्यांच्याकडून अर्ज मागून घेवून नव्याने फेर्या याद्या तयार झाल्या असून येत्या एक-दोन दिवसात शेतकर्यांना दुष्काळ निधीचे वाटप होईल असे सांगितले. (वार्ताहर)

शेतकरी प्रतिक्षेत
न वघा बाजार : लाभार्थी शेतकर्यांच्या निधीच्या याद्या प्रसिद्ध होवून महिना लोटला तरी अद्याप वाटपास सुरुवात झाली नसल्याने शेतकरी प्रतिक्षेत आहेत. या बाबत मंडळ अधिकारी कोथळकर यांना विचारणा केली असता शेतकर्यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या परंतु या याद्यामध्ये बर्याच शेतकर्यांची नावे आले नसल्याने त्यांच्याकडून अर्ज मागून घेवून नव्याने फेर्या याद्या तयार झाल्या असून येत्या एक-दोन दिवसात शेतकर्यांना दुष्काळ निधीचे वाटप होईल असे सांगितले. (वार्ताहर)संत सेवालाल महाराज जयंतीचे आयोजनकिनवट : संत सेवालाल महाराज यांची २७६ वी जयंती सोहळ्याचे आयोजन १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता दुर्गा मैदान किनवट येथे करण्यात आले आहे.या सोहळ्यास गुरुवर्य प.पु. गोमानंदबापू महाराज यांची उपस्थिती राहणार असून त्यांच्या शुभहस्ते या जयंती सोहळ्याला सुरुवात होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किनवटचे आ. प्रदीप नाईक हे राहणार आहेत. उद्घाटन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते होणार आहे. विशेष अतिथी म्हणून माजीमंत्री मनोहर नाईक, विधान परिषद सदस्य आ. हरिभाऊ राठोड यांची उपस्थिती राहणार आहे. माजी उपाध्यक्ष जि.प. नांदेडचे प्रकाश गब्बा राठोड, जि.प.चे बांधकाम सभापती दिनकर दहीफळे, पं.स.चे उपसभापती किशोर चव्हाण, जि.प. सदस्य बंडूसिंग नाईक, धरमसिंग राठोड, तहसीलदार शिवाजी राठोड, नांदेड जि.प.चे अति उपमुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब राठोड, प्रकाश अधिकारी शंकर राठोड, समाधान जाधव, अर्जून आडे, सहाय्यक वनसंरक्षक एस.जी. राठोड आदींची उपस्थिती राहणार आहे.कपील नाईक, प्रविण राठोड, आकाश जाधव, सचिन नाईक यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या जयंती सोहळ्यास सर्व गौर बंजारा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक संतसेवालाल महाराज जयंती उत्सव सोहळ्याच्या वतीने करण्यात आले आहे. राहूल नाईक व त्यांचे सहकारी या जयंती सोहळ्याच्या जय्यत तयारीला लागले आहे. (वार्ताहर)