विहिर अनुदानाची प्रतिक्षा
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:50+5:302015-02-14T23:51:50+5:30
शिवणी : शिवणी ता. किनवट परिसरातील काही गावातील अल्पभूधारकांना शेतकर्यांना विहिरीचा निधी न दिल्याने अनेक शेतकर्यांना विहिरीचे पूर्ण केलेल्या कामासाठी लागलेली मजुरी खर्च देण्यासाठी कर्जबाजारी व्हावे लागले. दोन वर्षापासून त्यांनी काढलेल्या कर्जाचा बोजा वाढत गेला परंतु शासन, प्रशासन मात्र शेतकर्यांना विहिरीचा निधी देण्यास टाळाटाळ करीत असल्याने परिसरातील शेतकरी आंदोलणाच्या पावित्र्यात आहेत.

विहिर अनुदानाची प्रतिक्षा
श वणी : शिवणी ता. किनवट परिसरातील काही गावातील अल्पभूधारकांना शेतकर्यांना विहिरीचा निधी न दिल्याने अनेक शेतकर्यांना विहिरीचे पूर्ण केलेल्या कामासाठी लागलेली मजुरी खर्च देण्यासाठी कर्जबाजारी व्हावे लागले. दोन वर्षापासून त्यांनी काढलेल्या कर्जाचा बोजा वाढत गेला परंतु शासन, प्रशासन मात्र शेतकर्यांना विहिरीचा निधी देण्यास टाळाटाळ करीत असल्याने परिसरातील शेतकरी आंदोलणाच्या पावित्र्यात आहेत.शेतकर्यांनी विहिरीसाठी कर्ज काढून विहिरी खोदल्या काही शेतकर्यांनी तर आपल्या खोदकाम झालेल्या विहिरीचे बांधकामही करुन घेतले तर काही शेतकर्यांना आपल्याकडे पैसे नसल्याने दोन वर्षापासून विहिरीचे बांधकामासाठी करता आले नाही. अनेक शेतकर्यांच्या विहिरीमध्ये पावसाळ्यात पावसाच्या पाण्यांनी वाहून आलेला गाळ आपल्या विहिरीत गेल्याने त्या शेतकर्यांना पुन्हा आपल्या विहिरीसाठी पैसा खर्च करावा लागतो. त्यासाठी शासन व प्रशासन दुष्काळात होरपळत असणार्या शेतकर्यांना विहिरीचे अनुदान द्यावे, अशी मागणी विहिरीचे काम केलेल्या शेतकर्यांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)