वेकोलि कामगार आत्महत्या प्रकरण
By Admin | Updated: December 19, 2014 23:55 IST2014-12-19T23:55:48+5:302014-12-19T23:55:48+5:30
वेकोलि कामगार आत्महत्या

वेकोलि कामगार आत्महत्या प्रकरण
व कोलि कामगार आत्महत्या कामगार नेता निर्दोषनागपूर : खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चनकापूर येथील एका वेकोलि कामगाराच्या आत्महत्येप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश सादिक उमर यांच्या न्यायालयाने एका आरोपी कामगार नेत्याची सबळ पुराव्याअभावी संशयाचा लाभ देऊन निर्दोष सुटका केली. उदयकुमारसिंग बैजनाथसिंग, असे आरोपीचे नाव आहे. तो कामगार संघटना चालवितो. रामायणसिंग कुशवाह (४५), असे मृताचे नाव होते. तो खाण कामगार होता. सरकार पक्षानुसार या प्रकरणाची हकीकत अशी, रामायणसिंगला दोन बायका होत्या. त्याची पहिली पत्नी गुलाबी देवी ही उत्तर प्रदेशातील बंगाली पट्टी पडरवना या ठिकाणी राहते. दुसरी पत्नी नीलम त्याच्यासोबत राहत होती. नीलमचे उदयकुमारसिंग याच्यासोबत अनैतिक संबंध आहेत, असा रामायणसिंग याला संशय होता. त्यामुळे त्याने तिचा खून केला होता. या खुनात अटक होण्यापूर्वीच ८ नोव्हेंबर २०१२ रोजी रामायणसिंग याने गळफास लावून आत्महत्या केली होती. खापरखेडा पोलिसांनी उदयकुमारसिंग याला या आत्महत्येस जबाबदार ठरवून त्याला भादंविच्या ३०६ कलमान्वये अटक केली होती. न्यायालयात आरोपीच्यावतीने ॲड. चेतन ठाकूर तर सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील विलास राऊत यांनी काम पाहिले.