शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

 दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, 8 फेब्रुवारीला मतदान, तर 11 रोजी मतमोजणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 16:03 IST

मुख्य मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

नवी दिल्ली - पुढील महिन्यात होणाऱ्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल अखेर आज वाजले. आज दुपारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 70 सदस्यसंख्या असलेल्या दिल्ली विधानसभेसाठी  8  फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. मुख्य मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.  निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर केल्यापासून दिल्लीत आचारसंहिता लागू झाली आहे. 

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ''दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. यावेळी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 1.46 कोटी मतदार मतदान करतील.   13 हजार 750 मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाईल. मतदान केंद्रांवर दिव्यांग आणि वृद्धांसाठी विशेष सुविधा दिली जाईल. तसेच 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक पोस्टल बॅलेटद्वावर मतदान करू शकतील.'' 

''दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अधिसूचना 14 जानेवारी रोजी जारी होईल. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तारीख 21 जानेवारी ही असेल. उमेदवारी अर्जांची छाननी 22 जानेवारी रोजी होणार असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी असेल. त्यानंतर 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल," असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले. या निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्ष (आप) आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्येच प्रमुख लढत होण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसही दिल्लीमधील आपला दुरावलेला जनाधार पुन्हा मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहे. 2015 मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने 67 जागा जिंकत निर्विवाद विजय मिळवला होता. भाजपाला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले होते. तर काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नव्हता. 

दिल्ली भाजपाचा सर्व्हे आला; उडू शकते केजरीवालांच्या आमदारांची झोप भाजपाला केजरीवालांची भीती का वाटते?, मनीष सिसोदियांनी सांगितलं कारण...दरम्यान, 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने आप आणि काँग्रेसला मात देत दिल्लीतील सात पैकी सात जागांवर कमळ फुलवले होते. त्यावेळी 70 पैकी 65 विधानसभा मतदारसंघात भाजपाला आघाडी मिळाली होती. तर काँग्रेसला 5 मतदारसंघात आघाडी मिळाली होती. तर आपला एकाही मतदार संघात आघाडी मिळाली नव्हती.  मात्र दिल्लीतील मतदारांचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी वेगवेगळा कौल देण्याचा कल पाहता दिल्लीतील राजकीय समीकरण गुंतागुंतीचे बनलेले आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदानAAPआपBJPभाजपाcongressकाँग्रेस