शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

राज्यसभा उपसभापती निवडणुकीत काँग्रेसच्या मित्र पक्षांची मते फुटली 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2018 8:07 PM

भाजपाच्या धुरिणांनी विविध प्रादेशिक पक्षांशी योग्य ताळमेळ जमवून मतांचे गणित कुशलतेने सोडवले आणि मोदी सरकारच्या विरोधकांचे ऐक्य हे पोकळ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले.

नवी दिल्ली - आज झालेल्या राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत अखेर भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचे उमेदवार हरिवंश यांनी बाजी मारली. त्यांनी काँग्रेसकडून उभे असलेले विरोधी उमेदवार बी.के. हरिप्रसाद यांचा 125 विरुद्ध 105 अशा फरकाने पराभव केला. एकीकडे काँग्रेसने एनडीएच्या उमेदवाराला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाच्या धुरिणांनी विविध प्रादेशिक पक्षांशी योग्य ताळमेळ जमवून मतांचे गणित कुशलतेने सोडवले आणि मोदी सरकारच्या विरोधकांचे ऐक्य हे पोकळ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. तसेच काँग्रेसच्या मित्रपक्षांच्या काही सदस्यांनीही काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात मतदान केले.  काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलचे खासदार राम जेठमलानी यांनी पक्षादेश धुडकावून एनडीएच्या उमेदवाराला मतदान केले. राम जेठमलानी हे याआधी भाजपाकडून खासदार होते. मात्र पक्षाविरोधात विधान केल्याने त्यांची भाजपातून हकालपट्टी झाली होती. नंतर 2016 साली लालूप्रसाद यादव यांनी राष्ट्रीय जनता दल पक्षाकडून राज्यसभेवर पाठवले. दुसरीकडे आम आदमी पक्षाने देखील काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करण्याचे टाळले होते. तर टीआरएस, बीजेडी आणि अन्य प्रादेशिक पक्षांनाही आपल्या बाजूने वळवण्यात काँग्रेसला अपयश आले होते.  

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूक