२०२४ च्या निवडणुकीपूर्वी व्होटर कार्ड आधारला लिंक होणार, मतदारांना मिळणार हा पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 17:38 IST2022-07-06T17:37:17+5:302022-07-06T17:38:01+5:30
Aadhar Linked Voter Card: आधार कार्डला व्होटर कार्डशी लिंक करण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे. सरकारकडून ही प्रक्रिया २०२४ रोजी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी पूर्ण करण्यात येईल.

२०२४ च्या निवडणुकीपूर्वी व्होटर कार्ड आधारला लिंक होणार, मतदारांना मिळणार हा पर्याय
नवी दिल्ली - आधार कार्डला व्होटर कार्डशी लिंक करण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे. सरकारकडून ही प्रक्रिया २०२४ रोजी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी पूर्ण करण्यात येईल. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अभियान चालवण्यात येईल. ज्यामध्ये सर्व मतदारांचे आधार क्रमांक ऐच्छिकपणे गोळा केले जातील.
एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार हल्लीत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एक पत्र पाठवण्यात आले आहे. यामध्ये निवडणूक आयोगाने सांगितले आहे की, आधार नंबर मतदार कार्डाशी लिंक करण्यासाठी क्लस्टर लेव्हलवर स्पेशल कॅम्प आयोजित केले जाऊ शकतात. जिथे मतदारांना असं का केलं जातंय हे सांगण्यात येईल. तसेच मतदाराने आधार कार्डचा नंबर द्यायचा की, नाही हे पूर्णपणे स्वैच्छिक असेल.
निवडणूक आयोगाने पत्रामध्ये सांगितले की, मतदाराची माहिती आणि या प्रक्रियेची कागदपत्रे लीक होता कामा नये. त्याची गोपनीयता कायम राहिली पाहिजे. न्याय मंत्रालयाने हल्लीच एक नोटिफिकेशन जारी केलं होतं. यामध्ये सांगितले होते की, नव्या नियमांनुसार १ एप्रिल रोजी २०२३ किंवा तत्पूर्वी ज्या लोकांची नावं मतदार यादीत समाविष्ट असतील, ते आपले आधार नंबर सांगू शकतात.