शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

'तुम्ही आम्हाला मत द्या, आम्ही तुम्हाला 50 रुपयांत दारू देऊ'; भाजप प्रदेशाध्यक्षाचे अजब विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 10:33 IST

'राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे दारुचे कारखाने, ते बनावट दारू पुरवतात. आम्ही दर्जेदार दारुच्या किमती कमी करू.'

अमरावती: निवडणुकीपूर्वी सर्वच पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासने देत असतात. पण, एका भाजप नेत्याचे आश्वास चर्चेचा विषय बनला आहे. आंध्र प्रदेशचे भारतीय जनता पक्षाचे (BJP) अध्यक्ष सोमू वीरराजू (Somu Veerraju) यांनी आंध्र प्रदेशात भाजपची सत्ता आल्यास अवघ्या 50 रुपयांमध्ये दारू दिली जाईल, असे आश्वासन दिले आहे. 

'राज्यात दर्जेदार कंपनीच्या दारू नाहीत'एकीकडे बिहारमध्ये भाजप-राजदचे युतीचे सरकार आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दारु बंदीची घोषणा केली आहे. त्यांचा हा निर्णय चर्चेत आहे, पण दुसरीकडे भाजप नेत्याच्या विधानामुळे पक्ष अडचणीत येऊ शकतो. सध्या दर्जेदार दारुच्या बाटलीची किंमत 180-200(180ml) रुपयांपेक्षा जास्त आहे. मंगळवारी विजयवाडा येथे पक्षाच्या जाहीर सभेला संबोधित करताना, वीरराजू यांनी निकृष्ट दर्जाची दारू चढ्या किमतीत विकल्याबद्दल राज्य सरकारवर टीका केली. राज्यात सर्वच बनावट ब्रँड्स चढ्या किमतीत विकले जातात, तर लोकप्रिय आणि लोकप्रिय ब्रँड्स उपलब्ध नसल्याचा आरोप त्यांनी केला.

'1 कोटी दारु पिणाऱ्यांनी आम्हाला मत द्यावे'ते पुढे म्हणाले की, राज्यातील प्रत्येक व्यक्ती दारुवर महिन्याला 12 हजार रुपये खर्च करत आहे. राज्यात एक कोटी लोक दारुचे सेवन करतात. या एक कोटी लोकांनी 2024 च्या निवडणुकीत भाजपला मतदान करावे. आमची सत्ता आल्यास दर्जेदा रदारू 75 रुपये प्रति बाटली दराने देऊ. जर राज्याचा महसूल  वाढला, तर ही किंमत 50 रुपये प्रति बाटली करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

'सत्ताधारी नेत्यांचे दारुचे कारखाने'

वीरराजू पुढे म्हणाले, राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे दारुचे कारखाने आहेत. ते सरकारला स्वस्तात दारू पुरवतात. भाजपची सत्ता आल्यास राज्यातील जनतेला मोफत शिक्षण आणि मोफत आरोग्य योजना देण्याचे आश्वासनही सोमू वीरराजू यांनी दिले. राज्यात दर्जेदार शिक्षण आणि दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याचे आश्वासन देत शेतीला पर्यायही आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशBJPभाजपाliquor banदारूबंदी