रामनवमीनिमित्त व्हॉलीबॉल व क्रिकेट स्पर्धा

By Admin | Updated: March 21, 2015 00:21 IST2015-03-20T22:39:38+5:302015-03-21T00:21:17+5:30

पंचवटी : येथिल श्रीराम सांस्कृतिक कला व क्रिडा मंडळ तसेच कुष्ठपिडीत बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रामनवमी निमित्ताने येत्या बुधवारपासून ओव्हर ऑर्म क्रिकेट तसेच व्हॉली बॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

Volleyball and cricket tournaments for Ram Navami | रामनवमीनिमित्त व्हॉलीबॉल व क्रिकेट स्पर्धा

रामनवमीनिमित्त व्हॉलीबॉल व क्रिकेट स्पर्धा

पंचवटी : येथिल श्रीराम सांस्कृतिक कला व क्रिडा मंडळ तसेच कुष्ठपिडीत बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रामनवमी निमित्ताने येत्या बुधवारपासून ओव्हर ऑर्म क्रिकेट तसेच व्हॉली बॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
वाल्मिनगर येथिल मैदानावर हया स्पर्धा संपन्न होणार असुन मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धांचे उदघाटन करण्यात येणार आहे. क्रिकेट तसेच व्हॉलीबॉल स्पर्धेतील विजेत्या संघाना रोख पारितोषिक व चषक देण्यात येणार आहे. क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक पटकावणार्‍या संघाला रोख ३३,३३३ रूपये, द्वितीय पारितोषिक २२,२२२ रूपये तर तृतिय क्रमांकासाठी ११,१११ रूपये देण्यात येणार आहे. तर व्हॉलीबॉल स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला ७,७७७ रूपये, द्वितीय ५,५५५, तर तृतिय पारितोषिक चषक देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे संयोजन नगरसेवक रूपाली गावंड, समाधान जाधव, संस्थेचे अध्यक्ष हेमंत शे˜ी यांनी केले असुन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संघांनी गोपाळ गोसावी, कृणाल पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Volleyball and cricket tournaments for Ram Navami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.