शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

Vodafoneला दिलासा, भारत सरकारविरोधात जिंकला 20 हजार कोटींचा खटला

By श्रीकृष्ण अंकुश | Published: September 25, 2020 7:21 PM

या प्रकरणाला 2007मध्ये सुरुवात झाली. याच वर्षी व्होडाफोनचा भारतात प्रवेश झाला होता. यावर्षी व्होडाफोनने हचिसनचे अधिग्रहण केले होते. व्होडाफोनने हचिंसन एस्सारचे 67 टक्के भागिदारीचे अधिग्रहण केले होते. या अधिग्रहणासाठी व्होडाफोनने तब्बल 11 अब्ज डॉलरहून अधिक किंमत मोजली होती.

ठळक मुद्देहे प्रकरण जवळपास 20 हजार कोटी रुपयांच्या रेट्रोस्पॅक्टिव्ह टॅक्ससंदर्भातील होते.या प्रकरणाला 2007मध्ये सुरुवात झाली.2016मध्ये कंपनीने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.

नवी दिल्ली - इंग्लंडची टेलीकॉम कंपनी वोडाफोनने भारत सरकारविरोधातील आंतरराष्ट्रीय लवादाचा एक महत्वपूर्ण खटला जिंकला आहे. हे प्रकरण जवळपास 20 हजार कोटी रुपयांच्या रेट्रोस्पॅक्टिव्ह टॅक्ससंदर्भातील होते. याचा निकाल व्होडाफोनच्याबाजूने लागला आहे. 

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान ट्रिब्यूनने म्हटले आहे, भारत सरकारने व्होडाफोनवर लादलेला अशाप्रकारचा कर, भारत आणि नेदरलँड यांच्यात झालेल्या गुंतवणूक कराचे उल्लंघन आहे. भारत सरकार आणि व्होडाफोन यांच्यातील हे प्रकरण 20,000 कोटी रुपयांच्या रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्ससंदर्भातील होते. यासंदर्भात व्होडाफोन आणि सरकार यांच्यात कुठल्याही प्रकारचा तोडगा न निघल्याने 2016मध्ये कंपनीने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. दीर्घ सुनावणीनंतर आता व्होडाफोनला दिलासा मिळाला आहे.

नवा कायदा; आता ग्रॅच्युइटीसाठी 5 वर्षांची प्रतीक्षा संपली, नोकरी करणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं मोठं गिफ्ट

असे आहे, संपूर्ण प्रकरण -या प्रकरणाला 2007मध्ये सुरुवात झाली. याच वर्षी व्होडाफोनचा भारतात प्रवेश झाला होता. यावर्षी व्होडाफोनने हचिसनचे अधिग्रहण केले होते. व्होडाफोनने हचिंसन एस्सारचे 67 टक्के भागिदारीचे अधिग्रहण केले होते. या अधिग्रहणासाठी व्होडाफोनने तब्बल 11 अब्ज डॉलरहून अधिक किंमत मोजली होती. हचिंसन एस्सारही भारतात काम करणारी एक मोबाईल कंपनी होती. 

EPFO आणि ESICच्या बदलांवर शिक्कामोर्तब, नोकरदारांना मिळणार 5 मोठे गिफ्ट

आयकर विभागाने भांडवली नफ्याचा आधार मानून कंपनीकडे कराची मागणी केली होती. मात्र त्याचा भरणा करण्यास कंपनीने नकार दिला होता. या प्रकरणातील आर्थिक देवाण-घेवाण भारतात झालेली नाही. त्यामुळे, हे अधिग्रहण कराच्या कक्षेत येत नाही, असे कंपनीने म्हटले होते. तर, व्होडाफेनने ज्या संपत्तीचे अधिग्रहण केले, ती भारतात होती, असे आयकर विभागाचे म्हणजे होते. सध्या व्होडाफोन आणि आयडिया भारतात एकत्र आले आहेत. व्होडाफोन-आयडिया ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे.

आता आला नवा बँकिंग कायदा, संसदेत मिळाली मंजुरी; ग्राहकांवर होणार असा परिणाम

टॅग्स :Vodafoneव्होडाफोनCentral Governmentकेंद्र सरकारIncome Taxइन्कम टॅक्सIndiaभारत