शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर; ८ दशकांची रशियासोबतची मैत्री होणार दृढ, जगाचे असणार लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 05:45 IST

Vladimir Putin India Visit:अमेरिकी निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर दोन महासत्तांची भेट; संरक्षण, ऊर्जा आणि व्यापार यावर होणार महत्त्वाचे करार; तेलनिर्बंध असूनही रशिया कमी किमतीत तेल खरेदीचा देणार भारताला नवा प्रस्ताव

नवी दिल्ली : दोन दिवसांच्या भारतभेटीसाठी गुरुवारी संध्याकाळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे येथे आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकीय शिष्टाचार मोडत पुतिन यांचे मिठी मारून स्वागत केले. त्यानंतर मोदींनी पुतिन यांना आपल्या कारमध्ये  बसवले आणि कार मोदींच्या निवासस्थानाकडे रवाना झाली. तेथे रात्री पुतिन यांच्यासाठी खास भोजन समारंभ आयोजित करण्यात आला होता.

टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत-अमेरिका संबंधात आलेला तणाव आणि अमेरिकेने रशियाच्या तेलआयातीवर निर्बंध घालून भारताची केलेली कोंडी या पार्श्वभूमीवर पुतिन यांचा २७ तासांचा दौरा आंतरराष्ट्रीय राजकारणातील एक महत्त्वाची घडामोड आहे. पुतिन यांची भेट २३ व्या भारत-रशिया शिखर परिषदेचाही एक भाग आहे. पुतिन यांच्या दौऱ्यात  व्यापार, संरक्षण, उर्जा आदी विषयांवर महत्त्वाचे करार होत आहेत. 

पुतिन यांच्यासोबत व्यापारी शिष्टमंडळही आले आहे. जगभरात महत्त्वाचे भौगोलिक-राजकीय बदल झाले असले तरी भारत-रशियातील आठ दशकांची मैत्री टिकून आहे. ते संबंध अधिक दृढ करणे हाही या भेटीचा प्रमुख उद्देश आहे.

अधिक स्वस्त तेल विक्रीचा प्रस्ताव टॅरिफमुळे संकटात सापडलेल्या भारताला रशिया अधिक स्वस्त दरात तेल विकण्यास तयार आहे. हा मुद्दाही प्रामुख्याने चर्चेत असेल.

पुतिन यांचे आजचे कार्यक्रम

 पुतिन शुक्रवारी सकाळी राजघाट येथे भेट देणार असून त्यांचे राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत केले जाईल. त्यानंतर हैदराबाद हाउस येथे बैठक होणार असून, मोदी-पुतिन व प्रतिनिधीमंडळामध्ये विविध विषयांवर चर्चा होईल. येथे स्नेहभोजनही होणार आहे.

ही बैठक संपल्यानंतर पुतिन रशियाच्या प्रसारण खात्याचे नवे 'इंडिया चॅनेल' सुरू करतील. त्यानंतर संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिलेल्या सन्मानार्थ राजभोजनास ते उपस्थित राहतील. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास ते भारतातून रशियाकडे प्रयाण करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आजच्या शिखर परिषदेतील चर्चेचे महत्त्वाचे मुद्दे

संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करणे.

भारत–रशिया व्यापाराला बाह्य दबावापासून सुरक्षित ठेवणे.

लघु मॉड्युलर रिॲक्टर क्षेत्रात सहकार्याच्या नवीन शक्यता तपासणे.

कोणकोणते महत्त्वाचे करार होणार? 

रशियात संचार करण्यासाठी भारतीयांना सवलती देणे.

औषध, कृषी, अन्नपदार्थ व ग्राहकोपयोगी वस्तू, खते यांचा व्यापार.

युरेशियन इकॉनॉमिक युनियन फ्री ट्रेड करार.

रशियन एस-४०० क्षेपणास्त्र, लष्करी हार्डवेअर खरेदी.

एसयू-५७ लढाऊ जेट खरेदी.

'फ्लाइंग न्यूटन'द्वारे आगमन

पुतिन ज्या विमानातून आले त्याचे नाव 'फ्लाइंग न्यूटन' असे असून त्यात अत्याधुनिक दळणवळण यंत्रणा, क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा, बैठक कक्ष, व्यायामशाळा व वैद्यकीय कक्ष आहे. या विमानात एक न्यूक्लियर कमांड बटन असून त्याद्वारे ते हल्ल्याचा आदेश देऊ शकतात. या विमानात २६२ प्रवासी बसू शकतात व ते सलग ११ हजार किमी अंतर उड्डाण करू शकते. हे विमान हवेत असताना त्याला २ जेट विमानांचे संरक्षण दिले जाते.

English
हिंदी सारांश
Web Title : Putin Visits India: Strengthening Decades-Old Russia Ties Amid Global Focus.

Web Summary : Putin's India visit strengthens ties amid global shifts. Key discussions include trade, defense, and energy. Deals on cheaper oil and S-400 missiles are expected, solidifying the eight-decade-long friendship.
टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशियाNarendra Modiनरेंद्र मोदीPresidentराष्ट्राध्यक्षprime ministerपंतप्रधानIndiaभारत