पुतिन-मोदींची 'सरप्राइज राइड', सफेद रंगाच्या Fortuner ची सगळीकडे चर्चा, महाराष्ट्राशी कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 13:47 IST2025-12-05T13:46:49+5:302025-12-05T13:47:59+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमी वापरणाऱ्या रेंज रोवर ऐवजी रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्यासोबत सफेद टोयोटा फॉर्च्यूनरमध्ये बसले.

पुतिन-मोदींची 'सरप्राइज राइड', सफेद रंगाच्या Fortuner ची सगळीकडे चर्चा, महाराष्ट्राशी कनेक्शन
नवी दिल्ली - रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन २ दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. गुरुवारी संध्याकाळी ७ वाजता पुतिन यांचं विमान दिल्लीच्या पालम एअरपोर्टवर उतरले. ज्याठिकाणी तिथे उपस्थित असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले. या दोन्ही नेत्यांना एकमेकांना अभिवादन करत गळाभेट घेतली.
एअरपोर्टवर औपचारिक भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादीमीर पुतिन यांनी जे पाऊल उचलले त्याची कुणी कल्पना केली नव्हती. दोघेही जागतिक नेते, हायटेक सुरक्षा आणि त्याच सफेद रंगाची टोयोटा फॉर्च्यूनर, ज्यात दोन्ही नेते बसले आणि पालम एअरपोर्टवरून पंतप्रधान निवासस्थानी रवाना झाले.
का होतेय फॉर्च्यूनरची चर्चा?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमी वापरणाऱ्या रेंज रोवर ऐवजी रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्यासोबत सफेद टोयोटा फॉर्च्यूनरमध्ये बसले. हा नजारा वेगळा होता कारण कुणालाही ती अपेक्षा नव्हती. सेफ्टी प्रोटोकॉलवर या प्रकारे सगळेच हैराण झाले. पुतिन मोदी भेटीनंतर अचानक सोशल मीडियावर या SUV कारची चर्चा सुरू झाली आहे. सुरक्षा यंत्रणा अनेकदा व्हीआयपी हालचालींसाठी पांढऱ्या फॉर्च्युनर वापरतात. कारण हे मॉडेल सरकारी ताफ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते. या कारची स्थिरता आणि ग्राउंड क्लीयरन्स उत्तम आहे. भारतात देशातील अनेक दिग्गज नेते, सेलिब्रिटी या कारचा वापर करतात. दमदार इंजिन आणि खराब रस्त्यांवरही धावण्याची त्यात क्षमता आहे. या कारची २४ एप्रिल २०२४ रोजी मुंबई (मध्य) आरटीओमध्ये नोंदणी झाली. पहिल्या मालकाचे नाव A*D* *O*M*S*I*N*R*O*...*O*I*E*M*M*A* असे दिले आहे. ती एसपीजी किंवा महाराष्ट्र पोलिसांची कार असू शकते, जी केंद्रीय यंत्रणेत समाविष्ट करण्यात आली आहे.
महाराष्ट्राशी कनेक्शन
विशेष म्हणजे ज्या कारमध्ये जगातील सर्वात शक्तीशाली नेते व्लादीमीर पुतिन आणि नरेंद्र मोदी बसले होते त्या कारचे महाराष्ट्र कनेक्शन पुढे आले आहे. या कारचा रजिस्ट्रेशन नंबर MH01 EN 5795 आहे. ही टोयोटा फॉर्च्यूनर सिग्मा मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरिएंट होते. हे वाहन BS-VI मानक असून एप्रिल २०२४ मध्ये नोंदणी झालेली आहे २०३९ पर्यंत तिचे फिटनेस सर्टिफिकेट उपलब्ध आहे. ही फॉर्च्युनर ना पंतप्रधान मोदींच्या ताफ्यातील आहे ना पुतिन यांनी या कारचा कधी उपयोग केला आहे. सामान्यत: राष्ट्रपती पुतिन जेव्हा परदेशात दौरा करतात तेव्हा ते अत्याधुनिक सुरक्षेसाठी Aurus Senat कारमधून प्रवास करतात. ही कार रशियाचे राष्ट्रपती यांची अधिकृत स्टेट लिमोजीन कार आहे. जी जगभरात दमदार सेफ्टीसाठी प्रसिद्ध आहे. परंतु दिल्लीत पुतिन यांनी भारतीय फॉर्च्यूनर कारमध्ये प्रवास केला.