नवी दिल्ली - देशातील वर्तमानपत्र, मासिके आणि नियतकालिके प्रकाशित करणाऱ्या संस्थांची सर्वोच्च संघटना ‘इंडियन न्यूजपेपर सोसायटी’ (आयएनएस) या संस्थेच्या अध्यक्षपदी विवेक गुप्ता (सन्मार्ग) यांची निवड करण्यात आली. याआधीचे अध्यक्ष एम. व्ही. श्रेयाम्स कुमार यांची जागा ते घेतील. तसेच लोकमतचे संपादकीय संचालक करण राजेंद्र दर्डा यांची आयएनएसच्या डेप्युटी प्रेसिडेंट या पदावर तर लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांची आयएनएसचे कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली.
आयएनएसची ८६वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) पार पडली. आयएनएसच्या उपाध्यक्षपदी तन्मय महेश्वरी (अमर उजाला), कोषाध्यक्षपदी अनंत नाथ (गृहशोभिका) यांची निवड झाली आहे. तर मेरी पॉल यांच्याकडे सरचिटणीस पदाची जबाबदारी आहे. आयएनएस ही संस्था देशातील माध्यम जगताचा आवाज मानली जाते. वर्ष २०२५-२६ या वर्षासाठी निवडलेली ही कार्यकारिणी देशातील प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य, धोरणे आणि विकासासाठी कार्यरत राहील.
२०२५-२६ या कालावधीसाठी आयएनएसच्या कार्यकारिणीवर निवड झालेले सदस्यएस. बालासुब्रमण्यम आदित्यन (दैनिक तंती), गिरीश अग्रवाल– दैनिक भास्कर (भोपाळ), समाहित बाल (प्रगतीवादी), समुद्र भट्टाचार्य– हिंदुस्थान टाइम्स (पाटणा), होर्मुसी एन. कामा (बॉम्बे समाचार), गौरव चोप्रा (फिल्मी दुनिया), विजयकुमार चोप्रा (पंजाब केसरी), डॉ. विजय दर्डा (लोकमत -नागपूर), जगजीतसिंग दर्दी (चाऱ्हदिकला डेली), पल्लवी एस. डेम्पो (नवहिंद टाइम्स), विवेक गोयंका (दी इंडियन एक्स्प्रेस, मुंबई), महेंद्र मोहन गुप्ता (दैनिक जागरण), प्रदीप गुप्ता (डाटाक्वेस्ट), संजय गुप्ता (दैनिक जागरण –वाराणसी), शैलेश गुप्ता (मिड-डे), शिवेंद्र गुप्ता (बिझनेस स्टँडर्ड), योगेश जाधव (पुढारी), राजेश जैन (न्यू इंडिया हेरॉल्ड), सरविंदर कौर (अजित), विलास मराठे (दैनिक हिंदुस्थान-अमरावती), हर्षा मॅथ्यू (वनिता), ध्रुव मुखर्जी (अमृतबाझार पत्रिका), पी. व्ही. निधीश (बालभूमी), प्रताप पवार (सकाळ), राहुल राजखेवा (दी सेंटिनेल), आर. एम. आर. रमेश (दिनकरन), अतिदेब सरकार (दी टेलिग्राफ), अमाम एस. शाह (गुजरात समाचार–बडोदा, सूरत), डॉ. किरण ठाकूर (तरुण भारत-बेळगाव), सौभाग्यलक्ष्मी के. तिलक (मयुरा), बिजू वर्गीस (मंगलम प्लस), आय. वेंकट (इनाडू), कुंदन आर. व्यास (व्यापार–जन्मभूमी), किरण बी. वडोदरिया (वेस्टर्न टाइम्स), सोमेश शर्मा (राष्ट्रदूत साप्ताहिक), जयंत मॅमेन मॅथ्यू (मल्याळ मनोरमा), एल. अदिमूलम (इकॉनॉमिक टाइम्स), मोहित जैन (इकॉनॉमिक टाइम्स), के. आर. पी. रेड्डी (साक्षी), राकेश शर्मा (आज समाज), एम. व्ही. श्रेयाम्स कुमार (मातृभूमी)
Web Summary : Vivek Gupta elected INS President, succeeding M.V. Shreyams Kumar. Karan Darda becomes Deputy President. Vijay Darda joins the executive committee. The new team will focus on media freedom and development.
Web Summary : विवेक गुप्ता आईएनएस के अध्यक्ष चुने गए, एम.वी. श्रेयम्स कुमार का स्थान लेंगे। करण दर्डा उपाध्यक्ष बने। विजय दर्डा कार्यकारी समिति में शामिल। नई टीम मीडिया स्वतंत्रता और विकास पर ध्यान केंद्रित करेगी।