कापूस यांत्रिकीकरण प्रात्यक्षिकाला दीड हजार शेतकर्यांची भेट
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:17+5:302015-02-18T00:13:17+5:30
औरंगाबाद : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत औरंगाबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात शेतकर्यांना कापूस यांत्रिकीकरण प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तीन दिवसांत सुमारे दीड हजार शेतकर्यांनी कापूस प्रात्यक्षिकाची पाहणी केली.

कापूस यांत्रिकीकरण प्रात्यक्षिकाला दीड हजार शेतकर्यांची भेट
औ ंगाबाद : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत औरंगाबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात शेतकर्यांना कापूस यांत्रिकीकरण प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तीन दिवसांत सुमारे दीड हजार शेतकर्यांनी कापूस प्रात्यक्षिकाची पाहणी केली. प्रात्यक्षिक कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे माजी कुलगुरू डॉ. आर.बी. देशमुख, कृषी निविष्ठा संचालक जयंत देशमुख तसेच डॉ. भोसले, कृषी सहसंचालक जनार्दन जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात प्रत्येक दिवशी चारशे ते पाचशे शेतकर्यांना कापूस यांत्रिकीकरणाचे प्रात्यक्षिक दाखविले गेले. कार्यक्रमाचा समारोप कृषी आयुक्त विकास देशमुख यांच्या उपस्थितीत झाला. त्यांनी शेतकर्यांना शेतीविषयक माहिती व शासनाच्या योजना याबाबत माहिती दिली. कापूस यांत्रिकीकरण प्रात्यक्षिकास भेट देऊन त्यामध्ये लागवड पद्धत, झाडांची संख्या, कोरडवाहू लागवड, मशीनची सखोल माहिती घेतली. या प्रात्यक्षिकाच्या आयोजनासाठी डॉ. एस.एस. काझी, अभयसिंह साळुंके, नईम पटेल, नावीद शेख, गणेश सुलताने, जालंधर गोरे यांनी परिश्रम घेतले.