शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

शपथ घेण्यापूर्वी आज दिल्लीला जाणार कुमारस्वामी, राहुल आणि सोनिया गांधींची भेट घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 9:10 AM

कर्नाटकात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं राजकीय नाट्य आता जवळपास संपल्यात जमा आहे. भाजपाच्या येडियुरप्पांचं सरकार कोसळल्यानंतर आता काँग्रेस आणि जेडीएस नवं सरकार स्थापण्याच्या तयारीत आहेत.

नवी दिल्ली- कर्नाटकात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं राजकीय नाट्य आता जवळपास संपल्यात जमा आहे. भाजपाच्या येडियुरप्पांचं सरकार कोसळल्यानंतर आता काँग्रेस आणि जेडीएस नवं सरकार स्थापण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी एचडी कुमारस्वामी आज नवी दिल्लीत जाणार आहेत. नवी दिल्लीत कुमारस्वारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.दिल्लीत जाण्यापूर्वी कुमारस्वामी म्हणाले, सोनिया गांधी आणि राहुल गांधींची भेट घेणार असून, सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी आशीर्वादही घेणार आहे. तसेच या बैठकीत मंत्रिमंडळासंदर्भातही चर्चा होणार आहे. कोणाला कोणतं मंत्रिमंडळ मिळणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. तर कुमारस्वामी बुधवारी (23 मे) रोजी कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दिल्लीला जाण्यापूर्वी कुमारस्वामी बंगळुरूतल्या अनेक मंदिरांना भेट देणार आहेत. कुमारस्वामी आज दिल्लीला जाण्यापूर्वी लक्ष्मी नरसिम्हा मंदिर, हरदनहली शिव मंदिर, रंगनाथ मंदिर, यलिमलका मंदिरात जाऊन आशीर्वाद घेणार आहेत. त्यानंतर ते दिल्लीला रवाना होणार आहेत. कर्नाटकात एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारच्या सत्तावाटपाचा फॉर्म्युला जवळपास तयार झाला असून, त्यानुसार जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे 13 मंत्री व काँग्रेसचे 20 मंत्री बुधवारी शपथ घेतील, हे निश्चित झाले आहे.शपथविधीनंतर आपण 24 तासांतच बहुमत सिद्ध करू, असा दावा कुमारस्वामी यांनी केला आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी 15 दिवसांचा अवधी दिला आहे. कुमारस्वामी यांच्याबरोबर काँग्रेस नेतेही आज दिल्लीत जाणार आहेत. कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जी. परमेश्वरा म्हणाले, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमारबरोबर सोमवारी दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष जी. परमेश्वर यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणे नक्की आहे. तसेच काँग्रेस फोडण्याची येडियुरप्पांची खेळी उधळून लावणारे डी. के. शिवकुमार यांचेही मंत्रिमंडळातील स्थान नक्की आहे. कुमारस्वामींच्या पक्षाकडे वित्त खाते, तर काँग्रेसकडे गृह खाते राहील, असे सध्याचे चित्र आहे. हीच दोन अतिशय महत्त्वाची खाती मानली जातात. काँग्रेसकडून अधिकाधिक लिंगायत आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असा अंदाज असून, येडियुरप्पा यांचे भविष्यातील डाव यशस्वी होऊ नयेत, यासाठीच हे केले जाईल.बसपा, एक अपक्ष व एक मुस्लीम आमदारही सरकारमध्ये असेल.शपथविधीदरम्यान विरोधक करणार शक्तिप्रदर्शनकुमारस्वामी सरकारच्या शपथविधी सोहळ्यात विरोधक जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. राहुल गांधी, सोनिया गांधीबरोबरत तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव, बीएसपी प्रमुख मायावती, सपा नेते अखिलेश यादव, एनसीपी प्रमुख शरद पवार, तृणमूल काँग्रेस नेते ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव, डीएमके नेते कनिमोळीबरोबरच दिग्गज नेते शपथग्रहण सोहळ्यात सामील होण्याची शक्यता आहे. सरकार चालवणे, ही आमची जबाबदारीकाँग्रेसच काही काळाने हे सरकार पाडेल, असे भाजपा नेते सांगत आहेत. पण सरकारने आपला काळ पूर्ण करावा, असे आमचे प्रयत्न राहतील, असे सांगून काँग्रेस नेता म्हणाला की, सध्या भाजपाविरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी राहुल गांधी प्रयत्नशील आहेत. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुकाही आहेत. यामुळे सरकार पाडण्याचे प्रयत्न वा सरकार पडेल, अशी कृती काँग्रेसकडून होणार नाही.अडीच वर्षांचा फॉर्म्युला नाहीच : कुमारस्वामीमुख्यमंत्रीपद अडीच वर्षे कुमारस्वामी यांच्याकडे राहील आणि नंतर ते काँग्रेसकडे जाईल, अशा बातम्या शनिवारपासून पसरल्या होत्या. पण तसे घडणार नाही आणि आपणच पूर्ण काळ मुख्यमंत्री राहू, असे कुमारस्वामी यांनी व काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८