दिल्ली विधानसभा विसजिर्त करा

By Admin | Updated: July 22, 2014 00:26 IST2014-07-22T00:26:31+5:302014-07-22T00:26:31+5:30

24 आमदारांसह आज उपराज्यपाल नजीब जंग यांची भेट घेतली आणि घोडेबाजार रोखण्यासाठी दिल्ली विधानसभा तात्काळ विसजिर्त करण्याची मागणी केली.

Visit the Delhi Legislative Assembly | दिल्ली विधानसभा विसजिर्त करा

दिल्ली विधानसभा विसजिर्त करा

नवी दिल्ली : दिल्लीत सरकार स्थापण्यासाठी भाजपामधील गट प्रयत्नशील असताना आम आदमी पार्टीप्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पक्षाच्या 24 आमदारांसह आज उपराज्यपाल नजीब जंग यांची भेट घेतली आणि घोडेबाजार रोखण्यासाठी दिल्ली विधानसभा तात्काळ विसजिर्त करण्याची मागणी केली.
‘आप’ आमदार आणि जंग यांची सुमारे 25 मिनिटे बैठक झाली. त्यानंतर बोलताना जंग म्हणाले, संपूर्ण स्थितीचा आढावा घेऊन आणि इतरांशी विचारविनिमय केल्यानंतर सविस्तर अहवाल राष्ट्रपतींना पाठविण्यात येईल. 
या भेटीनंतर लगेच केजरीवाल यांनी टि¦ट केले. ते म्हणाले, उपराज्यपालांशी भेट झाली. चांगली चर्चा झाली. आता ते भाजपाला चर्चेला बोलावतील. भाजपाने सरकार स्थापनेचा दावा केल्यास उपराज्यपाल त्यांना समर्थक आमदारांची संख्या विचारतील. 
विधानसभा विसर्जित करण्यास विलंब होत असल्याने घोडेबाजाराला चालना मिळत आहे, असे आम्ही त्यांना सांगितले, असेही केजरीवाल म्हणाले. 
सध्याच्या स्थितीत सरकार स्थापन करणो अशक्य असल्याने शक्य तितक्या लवकर नव्याने निवडणूक घेण्याची मागणी आमच्या पक्षाने केली, असे आपचे वरिष्ठ नेते मनीष सिसोदिया म्हणाले. आम्ही 14 फेब्रुवारीला राजीनामा दिला होता. तेव्हादेखील विधानसभा विसर्जित करण्याची सूचना केली होती, असेही ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4भाजपाला दिल्ली विधानसभा निवडणूक नको आहे, असे आपने काल म्हटले होते. तसेच त्यांनी काँग्रेसने ‘मौन’ बाळगल्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. काँग्रेसला दिल्ली विधानसभा विसर्जित व्हावी असे वाटत नाही काय, असा सवालही आपने केला होता. 

 

Web Title: Visit the Delhi Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.