विराटच्या दिल्लीतील घरी अनुष्काचा गृहप्रवेश, उद्या होणार ग्रॅण्ड रिसेप्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 12:29 IST2017-12-20T12:26:45+5:302017-12-20T12:29:53+5:30

लग्न आणि हनिमूननंतर विरूष्का भारतात परतले आहेत.

Virat's home will be hosted by Anushka, tomorrow's Grand Reception | विराटच्या दिल्लीतील घरी अनुष्काचा गृहप्रवेश, उद्या होणार ग्रॅण्ड रिसेप्शन

विराटच्या दिल्लीतील घरी अनुष्काचा गृहप्रवेश, उद्या होणार ग्रॅण्ड रिसेप्शन

ठळक मुद्दे लग्न आणि हनिमूननंतर विरूष्का भारतात परतले आहेत.भारतात परतल्यानंतरचे त्यांचे दोन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नवी दिल्ली- टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी 11 डिसेंबरला इटलीमध्ये लग्न केलं. इटलीमधील डेस्टिनेशन वेडिंग व त्यानंतर फिनलँडमधील विरूष्काच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. लग्न आणि हनिमूननंतर विरूष्का भारतात परतले आहेत.  भारतात परतल्यानंतरचे त्यांचे दोन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो विराटच्या दिल्लीतील घरातील असल्याची चर्चा आहे. यामध्ये अनुष्का विराटच्या नातेवाईकांसोबत दिसत आहे. अनुष्काने गुलाबी रंगाचा  पंजाबी ड्रेस घातला असून तिच्या हातात चुडाही आहे. तर विराटने क्रीम रंगाचा कुर्ता आणि पायजमा घातला आहे. 

मंगळवारी दिल्लीत आल्यानंतर विरूष्काने 21 डिसेंबरलाच म्हणजे उद्या होणाऱ्या रिसेप्शनची जोरदार तयारी केली आहे. विरूष्काच्या लग्नाचे दोन ग्रॅण्ड रिसेप्शन होणार आहेत. दिल्लीत 21 डिसेंबरला व मुंबईत 26 डिसेंबरला रिसेप्शन होणार आहे. बॉलिवूड व क्रीडा विश्वातील अनेक दिग्गज या रिसेप्शनला हजर राहतील. दिल्लीतील दरबार हॉल, ताज डिप्लोमॅटिक इनक्लेव्ह येथे रिसेप्शन होईल. तर २६ तारखेला मुंबईतील अॅस्टर बॉलरुम, सेट रेगिस, लोअर परेल येथे ग्रॅण्ड रिसेप्शन होईल. या रिसेप्शनच्या निमंत्रण पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दोन्ही निमंत्रण पत्रिकांची थीम पर्यावरणाशी निगडीत आहेत.

काही दिवसांपूर्वी अनुष्कानेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्यांच्या हनिमूनचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये बर्फाळ भागात विरुष्का एकमेकांसोबत निवांत वेळ घालवताना दिसत होते. अनुष्काने हा फोटो शेअर करताच सोशल मीडियावर सगळीचकडे हा फोटो कमालिचा व्हायरल झाला होता.
 

Web Title: Virat's home will be hosted by Anushka, tomorrow's Grand Reception