Onion Cutting Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून नेहमीच घळघळा पाणी वाहतं. कांदा कापताना डोळ्यांतून पाणी येऊ नये, म्हणून गृहिणी वेगवेगळे उपाय करत असतात. अनेक जणी काही वेगवेगळ्या ट्रिक्स वापरतात. आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये महिलेने कांदा कापताना डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून एक जुगाड केला आहे. तिचा हा जुगाड सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. तुम्हीही हा व्हिडीओ बघायलाच हवा.
कांदा कापण्याची 'ही' पद्धत झाली व्हायरल!सोशल मीडियावरील या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला स्वयंपाकघरात बसून कांदे कापत आहे. कांदा कापताना डोळ्यातून अश्रू येऊ नयेत म्हणून महिलेने वापरलेली ही युक्ती पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. कांदा कापताना डोळ्यांतून पाणी येऊ नये म्हणून या महिलेने तिच्या डोक्यावर पदर घेतला आणि नंतर एक रुंद सेलो टेप डोळ्यांजवळून पदरच्या भागाला चिकटवली. त्या महिलेने तिचे डोळे अलगद टेपने झाकले आणि पटकन कांदे कापायला सुरुवात केली.
नेटकरीही झाले थक्क!कांदा कापण्याचा हा देसी जुगाड व्हिडीओ 'HinduHunDilse' नावाच्या अकाउंटवरून एक्स या सोशल साईटवर शेअर करण्यात आला आहे . या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'कांदा कापण्याचे हे तंत्र देशाबाहेर जाऊ नये.' आतापर्यंत हा व्हिडीओ साडेतीन लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि १ हजार लोकांनी तो लाईक केला आहे. अनेकांनी व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत.
एका युजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, "हा डिजिटल इंडिया आहे, जो विकासाकडे वाटचाल करत आहे. पूर्वी देशात असे तंत्रज्ञान नव्हते, आता आपल्या भारतात नवीन तंत्रज्ञान येत आहे." दुसऱ्याने लिहिले की, "असे लोक फक्त भारतातच जन्माला येतात." आणखी एकाने लिहिले, "हे काही तंत्र नाहीये, डोळे खराब करण्याचा हा एक मार्ग आहे. कांद्याच्या रसाने डोळे स्वच्छ होतात." तर एकाने कमेंट करत म्हटले की, "अतुलनीय! हे बघून नासाचे लोक देखील आश्चर्यचकित झाले आहेत."