शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
3
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
4
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
5
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
6
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
7
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
8
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
9
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
10
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
11
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
12
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
13
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
14
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
15
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
16
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
17
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
18
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
19
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
20
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा

Video : आमदाराला लॉकडाऊनमध्ये क्रिकेट खेळणं पडलं महागात; जमिनीवर आपटले अन् FIRही दाखल झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 16:29 IST

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमदाराच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

कोरोना व्हायरसच्या संकटात देशात लॉकडाऊन कायम आहे. पण, आमदारानंच लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केलं आहे. बिहार येथील बक्सरच्या ब्रह्मपुर विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रीय जनता दलाचे ( RJD) आमदार शंभूनथ यादव यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करताना एका क्रिकेट स्पर्धेचं उद्धाटन केलं. उद्धाटनासाठी त्यांनी फलंदाजीही केली. पण, फटका मारण्याच्या नादात आमदाराचा फुटबॉल झाला. ( RJD MLA play cricket during lockdown in Bihar; FIR lodged )

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमदाराच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आमदारासह स्पर्धा आयोजकांवर FIR नोंदवला गेला आहे. या उद्धाटन सोहळ्याला लोकांनीही प्रचंड गर्दी केली होती. तेव्हा त्यांनी पहिला चेंडू जोरदार टोलवला. त्यानंतर त्यांचा उत्साह आणखी वाढला आणि दुसरा फटका मारण्यासाठी सज्ज झाले. पण दुसऱ्यांदा फटका मारताना त्यांचा पाय घसरला अन् ते चांगलेच आपटले. समर्थक आणि बॉडिगार्ड्सनी त्यांना उचलले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आमदारासह 25 जणांवर FIR नोंदवला गेला. ( RJD MLA play cricket during lockdown in Bihar; FIR lodged )

पाहा व्हिडीओ...

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 46 लाख 46,707 इतकी झाली आहे. त्यापैकी 87 लाख 37,835 रुग्ण बरे झाले असले तरी 6 लाख 08,978 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 11 लाख 19,307 इतका झाला असून 27,514 जणांचं निधन झालं आहे. 7 लाख रुग्ण बरेही झाले आहेत. ( RJD MLA play cricket during lockdown in Bihar; FIR lodged )

अन्य महत्त्वाच्या बातम्या

कोरोनामुळे खेळाडूंवर आली उपासमारीची वेळ; दूध खरेदी करण्यासाठीही नाहीत पैसे! 

WiFi दुरुस्तीसाठी भारतीय क्रिकेटपटूच्या घरी थेट 'NASA'वरून आला व्यक्ती!

विराट कोहलीवर लट्टू झालेल्या महिला क्रिकेटपटूनं केला साखरपुडा; बॉलिवूड अभिनेत्रींनाही लाजवणारं तिचं सौंदर्य 

IPL 2020 च्या मार्गात आणखी एक विघ्न; BCCIने ठरवलेल्या तारखांवर ब्रॉडकास्टर नाराज, पण का? 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूच्या वडिलांना झाला कोरोना; आईच्या रिपोर्टची प्रतीक्षा

भारतामुळे शोएब मलिकचा इंग्लंड दौरा लांबणीवर; पाकिस्तान क्रिकेट मंडळाचं ट्विट

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSocial Viralसोशल व्हायरल