भारतामुळे शोएब मलिकचा इंग्लंड दौरा लांबणीवर; पाकिस्तान क्रिकेट मंडळाचं ट्विट

मोहम्मद आमीर इंग्लंड दौऱ्यावर जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 03:57 PM2020-07-20T15:57:55+5:302020-07-20T15:58:46+5:30

whatsapp join usJoin us
Departure of Shoaib Malik to England has been delayed after India extended the ban on international flights until 31 July | भारतामुळे शोएब मलिकचा इंग्लंड दौरा लांबणीवर; पाकिस्तान क्रिकेट मंडळाचं ट्विट

भारतामुळे शोएब मलिकचा इंग्लंड दौरा लांबणीवर; पाकिस्तान क्रिकेट मंडळाचं ट्विट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तानचे खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर गेले असून तेथे त्यांचा सराव सामनाही सुरू झाला आहे. पण, अजूनही काही खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहेत. जलदगती गोलंदाज मोहम्मद आमीरनं आता इंग्लंड दौऱ्यावर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( पीसीबी) त्याला दुजोराही दिला आहे. त्यात त्यांनी शोएब मलिक याचा इंग्लंड दौरा लांबवणीवर पडल्याचीही माहिती दिली. (Update on Amir and Shoaib travel plans)

दुसऱ्या बाळाच्या जन्मासाठी आमीर पत्नीसोबत लाहोर येथेच थांबला होता. मागील आठवड्यात त्याच्या घरी नन्ही परी जन्माला आली आणि आता त्यानं इंग्लंड दौऱ्यावर जाण्यासाठी पीसीबीकडे विनंती केली आहे. त्याशिवाय पीसीबीनं संघ व्यवस्थापकाच्या विनंतीमुळे मोहम्मद इम्रान यांनाही पाठवण्याची तयारी दर्शवली आहे.

आमीर आणि इम्रान यांची कोरोना आज कोरोना चाचणी होईल आणि इंग्लंड दौऱ्यावर जाण्यासाठी त्यांच्या दोन्ही चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह येणे गरजेचे आहे. पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर दोघांनाही लाहोर येथील जैव सुरक्षितता वातावरणार रहावे लागेल आणि बुधवारी दुसरा रिपोर्ट काढण्यात येईल. त्यानंतर ते इंग्लंडसाठी रवाना होतील. आमीर इंग्लंडमध्ये दाखल होताच राखीव यष्टिरक्षक-फलंदाज रोहैल नाझीर याची घरवापसी होईल. (Update on Amir and Shoaib travel plans)


दरम्यान, शोएब मलिकचा इंग्लंड दौरा लांबणीवर पडला आहे. भारतातील आंतरराष्ट्रीय विमान वाहतुक 31 जुलैपर्यंत रद्द केल्यामुळे शोएबला त्याची पत्नी सानिया मिर्झा आणि मुलगा इझहान यांना भेटता येणार नाही. त्यामुळे त्याला इंग्लंड दौऱ्यावर येण्यास विलंब होईल, असे पीसीबीनं स्पष्ट केलं. (Update on Amir and Shoaib travel plans)

भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिचा पती व  शोएब मलिक यांची मागील पाच महिन्यांपासून भेट झालेली नाही. दोघांच्या स्पर्धा आणि त्यानंतर जाहीर झालेला लॉकडाऊन यामुळे शोएब-सानिया यांना वेगवेगळ्या देशांत अडकावे लागले. सानिया आपल्या आई-वडिलांच्या घरी हैदराबाद येथे आहे, तर शोएब त्याच्या घरच्यांसह सिआलकोट, पाकिस्तान येथे आहे. पीसीबीनं त्याला पत्नी व मुलाला भेटण्यासाठी मुभा दिली होती. त्यानुसार तो सानियाला भेटून 24 ऑगस्टपर्यंत इंग्लंडमध्ये दाखल होणार होता.  

कोरोनामुळे खेळाडूंवर आली उपासमारीची वेळ; दूध खरेदी करण्यासाठीही नाहीत पैसे! 

WiFi दुरुस्तीसाठी भारतीय क्रिकेटपटूच्या घरी थेट 'NASA'वरून आला व्यक्ती!

विराट कोहलीवर लट्टू झालेल्या महिला क्रिकेटपटूनं केला साखरपुडा; बॉलिवूड अभिनेत्रींनाही लाजवणारं तिचं सौंदर्य 

IPL 2020 च्या मार्गात आणखी एक विघ्न; BCCIने ठरवलेल्या तारखांवर ब्रॉडकास्टर नाराज, पण का? 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूच्या वडिलांना झाला कोरोना; आईच्या रिपोर्टची प्रतीक्षा

 

Web Title: Departure of Shoaib Malik to England has been delayed after India extended the ban on international flights until 31 July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.