विराट कोहलीवर लट्टू झालेल्या महिला क्रिकेटपटूनं केला साखरपुडा; बॉलिवूड अभिनेत्रींनाही लाजवणारं तिचं सौंदर्य

जगातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या पाकिस्तानच्या कायनात इम्तियाजनं नुकताच साखरपुडा केला.

तिनं सोशल मीडियावर तिच्या साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले. कायनातनं 17 जुलैला साखरपुडा केला.

21 जून 1992 मध्ये कराची येथी कायनातचा जन्म झाला.

2010मध्ये तिनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमधून पदार्पण केलं.

कायनातनं पाकिस्तानकडून आतापर्यंत 11 वन डे, 12 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. तिच्या नावावर वन डेत 51 धावा आणि 9 विकेट्स आहेत आणि ट्वेंटी-20त 41 धावा व 6 विकेट्स आहेत.

कायनातच्या क्रिकेट कारकिर्दीला 2005मध्ये दिशा मिळाली. महिला आशिया चषक स्पर्धेदरम्यान भारताची गोलंदाज झूलन गोस्वामी हिच्याशी भेट झाल्यानंतर कैनतनं गोलंदाज बनण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ती 14 वर्षांची होती.

कायनात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीवर लट्टू झाली होती. कोहलीनं 2018मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे मालिकेत 558 धावा केल्या.

तेव्हा कायनात त्याची जबरदस्त फॅन झाली आणि तिनं सोशल मीडियावर कोहलीचं तौंडभरून कौतुक केलं होतं. तेव्हा ती चर्चेत आली होती.