Video - बापरे! इंजिनवरील ताबा सुटला, 70 प्रवासी असलेली ट्रेन अचानक उलट दिशेने धावली अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 09:53 AM2021-03-18T09:53:55+5:302021-03-18T10:07:35+5:30

Purnagiri Jansatabdi Train Runs Back : पूर्णागिरी जनशताब्दी एक्सप्रेस अचानक रेल्वे रुळांवरून उलट्या दिशेने धावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

viral video purnagiri jansatabdi train runs back passangers safe and three suspended | Video - बापरे! इंजिनवरील ताबा सुटला, 70 प्रवासी असलेली ट्रेन अचानक उलट दिशेने धावली अन्... 

Video - बापरे! इंजिनवरील ताबा सुटला, 70 प्रवासी असलेली ट्रेन अचानक उलट दिशेने धावली अन्... 

googlenewsNext

नवी दिल्ली - उत्तराखंड (Uttarakhand) मध्ये बुधवारी एक मोठी रेल्वे दुर्घटना (Train Accident) टळली आहे. नवी दिल्ली येथून टनकपूर येथे जाणारी पूर्णागिरी जनशताब्दी एक्सप्रेस (Purnagiri Jansatabdi) अचानक रेल्वे रुळांवरून उलट्या दिशेने धावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र काही किलोमीटर अंतर पार केल्यानंतर ती थांबवण्यात यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना घडली तेव्हा पूर्णागिरी जनशताब्दी एक्सप्रेसमधून जवळपास 60 ते 70 प्रवासी प्रवास करत होते. त्यांना चकरपूर येथे सुरक्षितरित्या उतरवण्यात आलं असून बसने त्यांच्या गावी पाठवण्यात आले आहे. 

उत्तराखंडमध्ये एका आठवड्यात ही दुसरी रेल्वे दुर्घटना घडली आहे. चंपावत पोलीस अधीक्षक लोकेश्वर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्णगिरी जनशताब्दी एक्स्प्रेसच्या चालकाला रेल्वे रुळावरवर प्राणी दिसताच त्याने दुर्घटना टाळण्यासाठी जोरात ब्रेक दाबला. पण यानंतर चालकाचा इंजिनावरील ताबा सुटला आणि संपूर्ण ट्रेन उलट दिशेने धावू लागली. यावेळी ट्रेनचा वेगदेखील सामान्य होता. ट्रेन चकरपूरमध्ये थांबवण्यात आली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसून प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला आहे. 

टनकपूर रेल्वे स्टेशनच्या अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन उलट्या दिशेने धावत असल्याची सूचना मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांना अलर्ट करण्यात आलं. तसेच रुळावर जागोजागी छोटे छोटे दगड ठेवण्यात आले. ज्यामुळे ट्रेनचा स्पीड कमी झाला आणि ती थांबवण्यात अखेर यश आले. ट्रेन उलट्या दिशेने धावून लागताच प्रवासी प्रचंड घाबरले. या संपूर्ण याप्रकरणाचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच लोको पायलट आणि सहायक लोको पायलट, गार्ड यांनी सस्पेंड करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Fact Check : 31 मार्चपर्यंत सर्व ट्रेन्स रद्द?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल मेसेजमागचं सत्य

कोरोनाच्या संकटात सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवणारे मेसेज हे व्हायरल होत आहेत. असाच एक मेसेज सध्या जोरदार व्हायरल होत असून ज्यामध्ये भारतीयरेल्वेने (Indian Railway) 31 मार्चपर्यंत सर्व ट्रेन्स रद्द (All trains cancelled till 31st march) केल्या आहेत असं म्हटलं आहे. या मेसेजमुळे लोकांमध्ये भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर 31 मार्चपर्यंत सर्व रेल्वे रद्द केल्याच्या मेसेज हा तुफान व्हायरल होत आहे. यासोबतच ब्रेकिंग स्वरुपातील बातमीचा एक व्हिडीओ देखील आत्ताचा असल्याचा दावा करून मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. मात्र आता प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो म्हणजेत PIB ने हे वृत्त फेटाळून लावले असून हे खोटं असल्याचं म्हटलं आहे. 31 मार्च रोजी ट्रेन बंद होणार असल्याच्या बातमीचा व्हिडीओ हो यंदाचा नसून गेल्या वर्षीचा असल्याचं म्हटलं आहे. पीआयबीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करून नागरिकांना अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.

Read in English

Web Title: viral video purnagiri jansatabdi train runs back passangers safe and three suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.