पाळीव कुत्र्यासोबत सायकलवरून देशभर प्रवास करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. संबंधित तरुण २ ज्योतिर्लिंगे आणि चार धामचे दर्शन पूर्ण करण्यासाठी सायकलवरून घरातून बाहेर पडला आहे. त्याने आतापर्यंत रामेश्वरम, केदारनाथ आणि बद्रीनाथला भेट दिली असून १२००० किलोमीटर अंतर कापले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत संबंधित तरूण असे बोलत आहे की, हॅलो, माझे नाव सोनू आहे, मी बिहारचा आहे. मी आत्तापर्यंत १२००० किलोमीटरहून अधिक सायकल चालवली आहे. मला घर सोडून ११ महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. मी माझा कुत्रा चार्ली याच्यासोबत प्रवास करत आहे. तो कधीच माझी पाठ सोडत नाही. मी जिथे जातो, तो तिथे माझ्या मागे येतो. मी आतापर्यंत रामेश्वरम, केदारनाथ आणि बद्रीनाथला भेट दिली आहे आणि आता प्रयागराजमधील कुंभमेळ्यात जातोय, हा फक्त एक व्हिडीओ नसून चार्ली आणि माझ्या प्रवासाची आठवण आहे, असे सोनू एका व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.
या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास सहा लाख लोकांनी पाहिले आहे. तर हजारो लोकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने कमेंट केली आहे की, 'चार्ली अनेकांच्या स्वप्नातील जीवन जगत आहे." दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले आहे की, लाइक्स आणि कमेंट्स मिळवण्याचा हा स्टंट केला जात आहे." तिसऱ्या वापरकर्त्याने म्हटले आहे की, "कुत्र्याला खायला प्यायलाही देत जा, फक्त सोबत घेऊन फिरू नको, त्याच्यामुळेच तुझे फॉलोवर्स वाढत आहेत." आणखी एका वापरकर्त्याने सोनूला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना म्हटले आहे की, "ऑल द बेस्ट मित्रा, चार्लीची काळजी घे."