कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांची उग्र निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 06:03 AM2020-09-29T06:03:10+5:302020-09-29T06:03:22+5:30

सुप्रीम कोर्टात आव्हान; देशभरात लोण

Violent protests by farmers against agricultural laws | कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांची उग्र निदर्शने

कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांची उग्र निदर्शने

Next

शीलेश शर्मा ।

नवी दिल्ली : केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात देशामध्ये सुरू असलेल्या आंदोलनाने आणखी उग्र स्वरूप धारण केले आहे. उत्तर भारतासह दक्षिणेतही या आंदोलनाचे लोण पसरत आहे. काँग्रेस खासदार टी. एन. प्रतापन यांनी याचिका दाखल करून या कायद्यांना सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे.

तामिळनाडूमध्ये द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी शेतकºयांच्या समर्थनासाठी सोमवारी धरणे धरले होते. दिल्लीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. पंजाब, हरयाणा, तामिळनाडू, तेलंगणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगढसह अन्य राज्यांमध्येही या कायद्यांना तीव्र विरोध होत आहे.

शेतकºयांना देहदंड - राहुल गांधी
हे कायदे म्हणजे शेतकºयांना मिळालेली देहदंडाची शिक्षा आहे, अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांमध्ये या कायद्यांविरोधात विधानसभेमध्ये प्रस्ताव संमत करण्यात येणार असल्याचे कळते. यात छत्तीसगढ आघाडीवर असेल असे सांगण्यात आले.

Web Title: Violent protests by farmers against agricultural laws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.