शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पद्मावतीला हिंसक विरोध चुकीचा - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंचा घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 14:59 IST

चित्रपटाला विरोध असेल तर कायदेशीर मार्गाने विरोध करा, हिंसक कारवाया करणं, धमकं देणं स्वीकारलं जाणार नाही अशा वाक्यात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी चिथावणीखोरांना फटकारलं आहे. एका कार्यक्रमात नायडू यांनी नोटाबंदी ते पद्मावती अशा सगळ्या विषयांवर चर्चा केली आणि परखड मते व्यक्त केली.

ठळक मुद्देकुणाच्या चित्रपटांमुळे भावना दुखावल्या असतील तर त्यांनी लोकशाही मार्गाने दाद मागावीभाजपाच्याच अनेक सत्ताधारी नेत्यांनी पद्मावती चित्रपटाच्या निर्माते कलाकारांविषयी हिंसक भाषा वापरली आहेलोकशाहीमध्ये चर्चेला महत्त्व असून वाद विवाद व्हायला हवेत

नवी दिल्ली - चित्रपटाला विरोध असेल तर कायदेशीर मार्गाने विरोध करा, हिंसक कारवाया करणं, धमकं देणं स्वीकारलं जाणार नाही अशा वाक्यात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी चिथावणीखोरांना फटकारलं आहे. एका कार्यक्रमात नायडू यांनी नोटाबंदी ते पद्मावती अशा सगळ्या विषयांवर चर्चा केली आणि परखड मते व्यक्त केली.

काही जणांनी पद्मावतीच्या कलाकारांविरोधात धमक्या दिल्या तसेच त्यांना मारहाण केल्यास इनाम जाहीर केली आहेत. त्यांची खिल्ली उडवताना नायडू म्हणाले की अशांकडे इतके पैसे तरी असतील की नाही शंका आहे. एक कोटी रुपये म्हणजे काय चेष्टा आहे का, असे सांगत प्रत्येकजण अशी इनामं  जाहीर करत असल्याचं ते म्हणाले.

'या' सहा मुख्यमंत्र्यांनी पद्मावती सिनेमावर उघडपणे व्यक्त केलं मत

लोकशाहीमध्ये अशा गोष्टींना थारा नसल्याचं नायडू म्हणाले असून जर कुणाच्या चित्रपटांमुळे भावना दुखावल्या असतील तर त्यांनी लोकशाही मार्गाने दाद मागावी असं नायडू म्हणाले. विशेष म्हणजे भाजपाच्याच अनेक सत्ताधारी नेत्यांनी पद्मावती चित्रपटाच्या निर्माते कलाकारांविषयी हिंसक भाषा वापरली आहे. अर्थात, एखाद्या विशिष्ट सिनेमाविषयी आपण बोलत नसून सगळ्याच बाबतीत हे लागू असल्याचं ते म्हणाले.

कोण होती पद्मावती ? जाणून घ्या का सुरु आहे वाद ?

लोकशाहीमध्ये चर्चेला महत्त्व असून वाद विवाद व्हायला हवेत आणि असहमतीचा अधिकार प्रत्येकाला असल्याबद्दल सर्वसहमती असायला हवी अशी अपेक्षा उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली. मातृभाषेचं महत्त्वही व्यंकय्या नायडूंनी यावेळी अधोरेखीत केलं. मातृभाषेचा आदर करायला हवा असं सांगताना, प्रत्येक मुलांनी आपली भाषा सिकायलाच हवी असं आग्रही प्रतिपादन त्यांनी केलं. आई, मातृभूमी, मातृभाषा, जन्मभूमी आणि महिलांचा सन्मान या पाच गोष्टी अत्यावश्यक असल्याचं नायडू यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले.