'या' सहा मुख्यमंत्र्यांनी पद्मावती सिनेमावर उघडपणे व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 03:40 PM2017-11-24T15:40:10+5:302017-11-24T15:50:34+5:30

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राजपूत समुदायाकडून झालेल्या मागणीनंतर मध्यप्रदेशात पद्मावती सिनेमावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीही सिनेमावर परखड मत व्यक्त केलं. इतिहासाची छेडछाड कोणालाही मान्य नसून आंदोलन करणारे योग्य असल्याचं त्यांनी म्हंटलं.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही सिनेमाला विरोध दर्शविला. सिनेमावरून होणाऱ्या वादाला भन्साळीसुद्धा जबाबदार आहे. लोकांच्या भावनेशी खेळायची त्यांना सवय झाली आहे. उत्तर प्रदेशात सिनेमावर बंदी कायम राहील, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हंटलं.

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनीही सिनेमावर मत व्यक्त केलं. आंदोलन करणाऱ्या संघटनांनी सांगितलेले बदल केल्याशिवाय सिनेमा प्रदर्शित केला जाऊ नये, अशी मागणी वसुंधरा राजे यांनी माहिती व प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहून केली.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सिनेमाला पाठिंबा दर्शविला. पद्मावतीचा वाद दुर्देवी असून यावर सिनेसृष्टीने एकत्र येऊन आवाज उठवायला हवा, असं ट्विट त्यांनी केलं.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सिनेमला पाठिंबा देत ट्विट केलं. दीपिका पादूकोणच्या पाठिशी असल्याचं त्यांनी म्हंटलं.