पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 08:25 AM2024-05-11T08:25:41+5:302024-05-11T08:28:09+5:30

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे सभा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर हल्लाबोल केला.

Lok Sabha Election 2024 - Uddhav Thackeray's Challenge to Prime Minister Narendra Modi | पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज

पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज

छत्रपती संभाजीनगर - Uddhav Thackeray on Narendra Modi ( Marathi News ) निवडणुकीत पंतप्रधान हा काळजीवाहू असला पाहिजे, त्यांना जी सुविधा मिळते ती आम्हालाही मिळाली पाहिजे. मला जनतेपासून भीती नाही, मोदींनी पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवावे असं चॅलेंज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील मविआचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी ते आले होते. 

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राने मोदींना झुकवलं आहे. मला माझ्या महाराष्ट्राचा अभिमान आहे. एवढी प्रचंड ताकद त्यांनी लावली आहे. मोदी शहनशांसारखे फिरतायेत. मी गेल्या आठवड्यात सोलापूरला गेलो, तिथून लातूरमार्गे जायचे होते. पण लातूरचा एअरपोर्ट बंद, पंतप्रधान येणार होते. पुण्यात पंतप्रधानांनी सभा घेतली तिथेही संपूर्ण छावणीचं स्वरुप दिलं होते. तुम्ही रस्त्यावर चालणार तिथे पोलीस उभे असतात. जेव्हा तुम्ही उडत असता तेव्हा बाकीच्यांना विमान बंदी असते. हा इतका कडेकोट बंदोबस्त घेऊन तुम्ही फिरता हे बरोबर नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच तु्म्ही समान नागरी कायदा हा प्रकार आहे, तो नंतर आणायचा का ते बघू, मात्र लोकशाहीत निवडणुका आल्यात. निवडणुकीत कुणी पंतप्रधान असता कामा नये, तो काळजीवाहू असला पाहिजे. मुख्यमंत्री असता कामा नये आणि ज्या सोयीसुविधा तुम्ही आम्हाला देता त्याच त्यांना दिल्या पाहिजेत. तुम्ही त्यांच्यासाठी एअरफोर्सची विमाने वापरणार असाल तर आमच्या अंबादास दानवे, चंद्रकांत खैरेंनाही दिले पाहिजे. जर तुम्ही आम्हाला बंदी करणार असाल तर त्यांनाही बंदी केली पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

मोदींच्या 'त्या' ऑफरची उडवली खिल्ली

दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी तुम्ही फोडली तरीही कधी मला डोळा मार, कधी पवारांना डोळा मार चाललं आहे. या आमच्याकडे, नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी म्हणायचं आणि त्यानंतर आ जा मेरे गाडी मै बैठ जा बोलायचे. हे एवढे घाबरले आहेत, ते आता दिल्ली बघत नाहीत, महाराष्ट्र तुम्हाला दिल्ली बघू देणार नाही असं सांगत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींच्या ऑफरची खिल्ली उडवली. 
 

Web Title: Lok Sabha Election 2024 - Uddhav Thackeray's Challenge to Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.