विनोद तावडे बिहारचे निवडणूक प्रभारी, भाजपने प्रकाश जावडेकर यांना सोपविली केरळची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 09:26 AM2024-01-28T09:26:54+5:302024-01-28T09:27:13+5:30

BJP News: आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता भाजपने २३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांसाठी निवडणूक प्रभारी व सहप्रभारी जाहीर केले.

Vinod Tawde is Bihar's election in-charge, BJP has handed over Kerala's responsibility to Prakash Javadekar | विनोद तावडे बिहारचे निवडणूक प्रभारी, भाजपने प्रकाश जावडेकर यांना सोपविली केरळची जबाबदारी

विनोद तावडे बिहारचे निवडणूक प्रभारी, भाजपने प्रकाश जावडेकर यांना सोपविली केरळची जबाबदारी

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता भाजपने २३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांसाठी निवडणूक प्रभारी व सहप्रभारी जाहीर केले. त्या पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांना बिहारचा निवडणूक प्रभारी तर भाजपचे राज्यसभा खासदार व झारखंडचे माजी प्रदेशाध्यक्ष दीपक प्रकाश यांना बिहारचे सहप्रभारी करण्यात आले आहे. भाजप नेते प्रकाश जावडेकर यांची केरळचे निवडणूक प्रभारी म्हणून निवड झाली.

भाजपने पत्रकात म्हटले आहे की, तावडे हे राजकीय घडामोडींविषयक प्रभारी आहेत. उपाध्यक्ष वैजयंती जय पांडा यांना उत्तर प्रदेशचे प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंतकुमार गौतम यांना उत्तराखंडचे प्रभारी म्हणून नेमले आहे. भाजपचे उपाध्यक्ष व राज्यसभा खासदार लक्ष्मीकांत देसाई यांची झारखंडचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. 

गुजरातमधील हालचालींवर सर्वांचे लक्ष
गुजरातचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे पंजाबचे विद्यमान प्रभारी विजय रूपानी यांना पंजाबचे निवडणूक प्रभारी करण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस नरेंद्रसिंग तोमर यांना पंजाबचे निवडणूक प्रभारी, तर विजय रूपानी छत्तीसगडचे निवडणूक प्रमुख बनले आहेत. 
 

Web Title: Vinod Tawde is Bihar's election in-charge, BJP has handed over Kerala's responsibility to Prakash Javadekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.