शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सावरकरांची 'ती' संकल्पना मोहम्मद जिनाने प्रत्यक्षात आणली; भूपेश बघेल यांचे वादग्रस्त विधान  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 15:40 IST

सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढाई केली. मात्र जेलमध्ये गेल्यानंतर इंग्रजांना माफी मागणारे अनेक पत्रे लिहिली.

रायसेन - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सगळीकडे कार्यक्रम होत असताना छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दिवंगत माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भूपेश बघेल यांनी सावरकरांची संकल्पना मोहम्मद जिनाने प्रत्यक्षात आणली असल्याचं विधान केलं आहे. 

यावेळी बोलताना भूपेश बघेल म्हणाले की, वीर सावरकर यांनी दोन राष्ट्राची संकल्पना आणण्याचा विचार मांडला होता. त्यानंतर मोहम्मद जिना यांनी ती संकल्पना स्वीकारली. यावरुन राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. तसेच सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढाई केली. मात्र जेलमध्ये गेल्यानंतर इंग्रजांना माफी मागणारे अनेक पत्रे लिहिली. त्यानंतर जेलमधून सुटल्यावर त्यांनी स्वतंत्र्याच्या लढ्यात भाग घेतला नाही असंही भूपेश बघेल यांनी सांगितले. 

लोकसभा निवडणुकीच्याआधीही सावरकरांवर काँग्रेस आणि भाजपामध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसची सत्ता असणाऱ्या राजस्थान सरकारच्या शिक्षण विभागाने दहावीच्या अभ्यासक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील धड्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला होता. तीन वर्षापूर्वी भाजपा सरकारच्या काळात विनायक दामोदर सावकर यांचा स्वातंत्र्यवीर आणि महान देशभक्त असा उल्लेख करण्यात आला होता. मात्र नव्याने स्थापन झालेल्या काँग्रेसने शालेय अभ्यासक्रमात वीर सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली होती असा उल्लेख करण्यात आला. त्यामुळे पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरुन नवा वाद पेटला होता.  

राजस्थान सरकारने अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी एक समिती गठित केली होती. या समितीच्या शिफारशींवरुन पाठ्यक्रमात बदल करण्यात आल्याचा दावा राजस्थानमधील शिक्षण मंत्री गोविंद सिंह दोतासरा यांनी केला होता. दोतासरा यांनी सांगितले होते की, मागील सरकारच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या व्यतिरिक्त अन्य स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांच्या योगदानाला महत्त्व दिलं नाही. मात्र पाठ्यपुस्तकात केलेल्या बदलावर भाजपाने आक्षेप घेतला आहे. वीर सावरकरांच्या धड्यात बदल करणे म्हणजे वीर सावरकरांचा अपमान असल्याची टीका भाजपाने काँग्रेस सरकरावर केली होती.मोहम्मद जिना यांच्या मागणीवरुनच भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली. मुस्लिम राष्ट्र म्हणून जिना यांनी पाकिस्तानला ओळख दिली. त्यामुळे भूपेश बघेल यांनी केलेले विधानावरुन वाद होण्याची चिन्हे आहेत.  

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरPakistanपाकिस्तानcongressकाँग्रेसBJPभाजपा