शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद! एका रुपयात इडली विकणार्‍या अम्माला शेफ विकास खन्नांचं सरप्राईज गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 13:46 IST

अम्मांना असं वाटतं की, कोणताही माणूस भुकेलेला राहू नये.

ठळक मुद्देगेल्या 30-35 वर्षांपासून कमलाथल अम्मा (वय 85) केवळ 1 रुपयात इडली विकून लोकांचे पोट भरत आहे. इतकेच नव्हे तर तामिळनाडूच्या या अम्मांनी लॉकडाऊनमध्येही इडलीच्या किमती वाढविल्या नाहीत. त्या दररोज उत्साहात लोकांना इडली पोहोचवतात आणि त्यांना खायला घालतात.

गेल्या 30-35 वर्षांपासून कमलाथल अम्मा (वय 85) केवळ 1 रुपयात इडली विकून लोकांचे पोट भरत आहे. इतकेच नव्हे तर तामिळनाडूच्या या अम्मांनी लॉकडाऊनमध्येही इडलीच्या किमती वाढविल्या नाहीत. त्या दररोज उत्साहात लोकांना इडली पोहोचवतात आणि त्यांना खायला घालतात. अम्मांना असं वाटतं की, कोणताही माणूस भुकेलेला राहू नये.जेव्हा सेलिब्रिटी शेफ विकास खन्ना यांना अम्माच्या या उदात्तकार्याची माहिती मिळाली, त्यानंतर विकास खन्ना यांनी ट्विटरद्वारे कमलाथल अम्माबद्दल माहिती गोळा केली. विकास खन्ना यांनी ट्विटरवर कोइम्बतूरमधील कमलाथल अम्मांची कुणी मला माहिती देऊ शकेल का, असं आवाहन केलं, त्यालाही अनेकांनी चांगला प्रतिसाद दिला. माझ्याकडे 350 किलो तांदूळ आहे. कोणीतरी त्यांच्याशी समन्वय साधण्यास मदत करावी. खरं तर विकास खन्नाला अम्माकडे 350 किलो तांदूळ पोहोचवायचे होते.विकास खन्ना यांच्या ट्विटनंतर अनेक लोक त्यांची मदत करण्यासाठी पुढे आले आणि शेफ यांना अम्मांपर्यंत तांदूळ पोहोचवता आले. विकास खन्ना एका ट्विटमध्ये लिहितात, आज आम्ही त्यांना आश्चर्यचकित केले. मदर्स डे च्या शुभेच्छा गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या निःस्वार्थ सेवेला भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफनं सलाम ठोकला होता. तामिळनाडूच्या के कमलथाल हा आजी मागील 30 वर्ष केवळ 1 रुपयात इडली विकत आहेत. लॉकडाऊनच्या काळात अनेक उद्योग बंद झाले असतानाही आर्थिक नुकसान सहन करत आजींनी मजुरांसाठी इडली विकण्याचं काम सुरूच ठेवलं आहे. कैफनं के कमलथाल यांचा फोटो शेअर करून त्यांच्या कामाचं कौतुक केलं होतं.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पाक राबवत असलेल्या योजनांना भारताचा विरोध; इम्रान सरकारला दिला गंभीर इशारा

Lockdown 4.0चं काऊंटडाऊन; आपल्या राज्याला कुठल्या सवलती मिळणार?

CoronaVirus news : कोरोनाच्या समूह संसर्गाची भीती, लॉकडाऊन हटवणं पडू शकतं महागात- तज्ज्ञ

CoronaVirus news : केंद्राच्या धरसोडवृत्तीमुळेच देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय; अमोल कोल्हेंची मोदी सरकारवर टीका

अमेरिका मैत्रीला जागला! भारताला व्हेंटिलेटर देणार अन् मिळून कोरोनाला हरवणार

प्रवासी मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला ट्रकची धडक, 24 जणांचा मृत्यू

...म्हणून विरोधी पक्षाने सावध राहायला हवे, शिवसेनेचा भाजपाला टोला

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या