बापरे! 5 पोत्यांमध्ये 4 कोटी, कारसह सोन्याचांदीचे दागिने; ड्रग्ज इन्स्पेक्टरकडे कोट्यवधींचं घबाड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 11:58 AM2022-06-26T11:58:30+5:302022-06-26T12:06:59+5:30

Drug Inspector Jitendra Kumar : नोटांनी भरलेली काही पोती, कागदपत्र, सोन्याचांदीचे दागिने, चार अलिशान कार आणि काही बँकांचे एटीएम जप्त केले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

vigilance raid 4 location of patna posted drug inspector jitendra kumar houses found huge amount of cash | बापरे! 5 पोत्यांमध्ये 4 कोटी, कारसह सोन्याचांदीचे दागिने; ड्रग्ज इन्स्पेक्टरकडे कोट्यवधींचं घबाड

बापरे! 5 पोत्यांमध्ये 4 कोटी, कारसह सोन्याचांदीचे दागिने; ड्रग्ज इन्स्पेक्टरकडे कोट्यवधींचं घबाड

Next

नवी दिल्ली - बिहारमधील एक ड्रग्ज इन्स्पेक्टर जितेंद्र कुमार यांच्या घरी दक्षता विभागाने धाड टाकली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्याच्या घरामध्ये टाकण्यात आलेल्या या छापेमारीत कोट्य़वधींचं घबाड सापडलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षता विभागाने नोटांनी भरलेली काही पोती, कागदपत्र, सोन्याचांदीचे दागिने, चार अलिशान कार आणि काही बँकांचे एटीएम जप्त केले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ड्रग्ज इन्स्पेक्टर जितेंद्र कुमार यांच्याविरोधात दक्षता विभागाने बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. 

दक्षता विभागाने न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर ही मोठी कारवाई केली आहे. जितेंद्र कुमार यांच्या सुल्तानगंज, पटनायेथील गोला रोड, जहानाबाद आणि गया या ठिकाणी धाड टाकली आहे. पथकाने कोट्यवधींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती दिली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे सापडले आहे जे मोजण्यासाठी चक्क नोटा मोजण्याचं मशीन मागवण्यात आलं आहे. दक्षता विभागाचे पथक कुमार यांच्या घरी पोहचले असता त्यांनी एक खोली उघडली. 

खोलीमध्ये चार कोटी रुपये किमतीच्या नोटा पाच पोत्यांमध्ये भरुन ठेवल्या होत्या. तर, अडीच किलो चांदी आणि अर्ध्या किलोपेक्षा जास्त सोन्याचे दागिने आढळले आहेत. दरम्यान, छाप्यात सापडलेल्या नोटा मोजण्यासाठी मशीन मागवण्यात आलं होतं. या छाप्यात मालमत्तेचीअनेक कागदपत्रे पथकाच्या हाती लागली आहेत. जलालपूर शहरात एक फ्लॅट, जहानबादमध्ये घर व जमिनीची कागदपत्रे पथकाच्या हाती लागले आहेत. तर, पाटणा, रांचीमध्ये त्यांचा एक फ्लॅट असल्याचा संशय असून त्याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे.

डीएसपी सुरेंद्र कुमार मौआर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी जितेंद्र कुमारविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारीच्या आधारावर जितेंद्र कुमार यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली असून आरोपी कुमार सध्या फरार आहे. जितेंद्र कुमार यांनी सरकारी नोकरी करताना मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. त्यांच्याविरोधात वारंवार तक्रारी येत होत्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: vigilance raid 4 location of patna posted drug inspector jitendra kumar houses found huge amount of cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.