इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक परिसरात बिबट्याचे दर्शन?
By Admin | Updated: August 26, 2015 00:18 IST2015-08-26T00:18:57+5:302015-08-26T00:18:57+5:30
इंदिरानगर : येथील जॉगिंग ट्रॅक परिसरात सोमवारी (दि़२४) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बिबट्या दिसल्याची परिसरात जोरदार चर्चा असून, नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे़

इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक परिसरात बिबट्याचे दर्शन?
इ दिरानगर : येथील जॉगिंग ट्रॅक परिसरात सोमवारी (दि़२४) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बिबट्या दिसल्याची परिसरात जोरदार चर्चा असून, नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे़सुचितानगरमधील एका सोसायटीमध्ये राहणारे ऋषिकेश वर्मा यांचा आठ वर्षांच्या मुलगा रस्त्यावर खेळत असताना अचानक घाबरलेला अवस्थेत घरात आला व सुमारे अर्धा तासांनी त्याने बिबट्या पाहिल्याचे सांगितले़ दरम्यान, एका भाजीविक्रेत्या महिलेस गवतामध्ये डोळे उंच व पळण्याच्या वेगावरून तो बिबट्या असल्याचे वाटले़ यानंतर नागरिकांनी शोधही घेतला; मात्र या दोघांव्यतिरिक्त कुणीही तो पाहिला नाही़दरम्यान, यापूर्वी हॉटेल रसोई, आत्मविश्वास सोसायटी व गजानन महाराज मंदिरालगतच्या बंगले परिसरात बिबट्या आल्याच्या घटना घडलेल्या आहेत़ (वार्ताहर)