शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

VIDEO : भर रस्त्यात जवानावर हात उगारणा-या 'त्या' महिलेला पोलिसांचा दणका !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 22:53 IST

भर रस्त्यात भारतीय लष्कराच्या जवानाला मारहाण करणा-या गुरुग्राममधील एका महिलेला दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. 

नवी दिल्ली, दि. 15 - भर रस्त्यात भारतीय लष्कराच्या जवानाला मारहाण करणा-या गुरुग्राममधील एका महिलेला दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक महिला भर रस्त्यात भारतीय लष्कराच्या जवानाला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर भारतीय लष्कराकडून करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी यासंदर्भात गुरुवारी (दि. 14) गुन्हा दाखल केला. या महिलेच्या विरोधात पोलिसांनी भारतीय दंड विधान 186, 353, 314 आणि 332 च्यानुसार गुन्हा दाखल करत आज तिला गुरुग्राममधील तिच्या घरातून अटक केली आहे. स्मृती कालरा या अटक केलेल्या 44 वर्षीय महिलेचे नाव आहे. दिल्लीतील वसंत कुंज भागात गेल्या शनिवारी ही मारहाण करतानाची घटना घडली. यावेळी स्मृती कालराने भरधाव गाडी चालवत असताना लष्कराच्या ट्रकला ओव्हरटेक केले आणि ट्रकच्यासमोर आपली गाडी थांबविली. त्यानंतर ट्रकमधील लष्कराचा जवान खाली उतरला असता स्मृती कालराने थेट त्याच्यावर हात उचलला. यावेळी जवान तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, ती त्याला मारहाण करत होती. यानंतर ट्रकमधून अन्य जवान खाली उतरला आणि त्याने मध्ये पडण्याचा प्रयत्न केला असता ही महिला घाईघाईत कारमध्ये बसली आणि निघून गेली.दरम्यान, हा घडलेला प्रकार दुस-या कारमधील दोन व्यक्तींनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. यामुळे हा व्हिडिओ पाहता-पाहता व्हायरल झाला आणि यावर सोशल मीडियातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. या घटनेनंतर पोलिसांनी स्मृती कालरा हिला गुरुग्राम येथील तिच्या राहत्या घरातून अटक केली आहे. तसेच, तिची गाडी सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसIndian Armyभारतीय जवानCrimeगुन्हा