शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
2
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
3
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
4
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
5
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
6
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
7
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
8
CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
9
‘स्लीपर वंदे भारत’वर मोठी अपडेट! १ हजार किमी अंतर ८ तासात, १६० प्रति तास वेग; पहिली सेवा...
10
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
11
व्हेनेजुएला-अमेरिका वादात रशियाची उडी; मादुरोंच्या मदतीला पुतिन धावले, ट्रम्पना धक्का...
12
'जुम्मा गर्ल' किमी काटकर आठवतेय का? लेटेस्ट फोटो आला समोर, ओळखणं झालंय कठीण
13
’सोयाबीन खरेदीचे केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी तीन लाख घेत आहेत’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
14
रिलेशिनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदा एकत्र दिसले गौरव कपूर-कृतिका कामरा, व्हिडीओ व्हायरल
15
इंस्टाग्रामच्या कंटाळवाण्या रील्सला म्हणा 'बाय बाय'! फक्त एका सेटिंगने बदला फीडचा अल्गोरिदम
16
Gujarat Flyover Collapse: गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला! ४ कामगार गंभीर जखमी, एक बेपत्ता
17
"माझ्या एका सिगारेटने दिल्लीच्या प्रदूषणात फरक पडणार नाही"; TMC खासदाराचं भाजपाला प्रत्युत्तर
18
Rahul Gandhi: "लाखो मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे" लोकसभेत राहुल गांधींचं महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य!
19
मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
20
टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: विरुष्काच्या रिसेप्शनला नरेंद्र मोदी पोहोचतात तरुणी ओरडली लव्ह यू; पहा काय होती मोदींची प्रतिक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 14:04 IST

नवविवाहित विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा दिल्लीतील रिसेप्शन सोहळा मोठ्या थाटामाटात गुरुवारी पार पडला. दिल्लीमधील हॉटेल ताजमध्ये पार पडलेल्या रिसेप्शन सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील हजेरी लावत भावी आयुष्यासाठी दोघांना शुभेच्छा दिल्या.

ठळक मुद्देवविवाहित विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा दिल्लीतील रिसेप्शन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडलारिसेप्शन सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रेटी उपस्थित होतेपंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील हजेरी लावत भावी आयुष्यासाठी दोघांना शुभेच्छा दिल्या

नवी दिल्ली - नवविवाहित विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा दिल्लीतील रिसेप्शन सोहळा मोठ्या थाटामाटात गुरुवारी पार पडला. दिल्लीमधील हॉटेल ताजमध्ये पार पडलेल्या रिसेप्शन सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील हजेरी लावत भावी आयुष्यासाठी दोघांना शुभेच्छा दिल्या. रिसेप्शनच्या एक दिवस आधी विरुष्काने नरेंद्र मोदींना रिसेप्शनसाठी आमंत्रण दिलं होतं. नरेंद्र मोदी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पोहोचले आणि गुलाब देत नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या. नरेंद्र मोदींनी दोघांसोबत फोटोही काढला. नरेंद्र मोदी विराट आणि अनुष्कासोबत स्टेजवर उभं राहून फोटो काढत असताना अनेकजण आपल्या मोबाइल फोनमध्ये फोटो आणि व्हिडीओ काढण्यात व्यस्त होते. यावेळी अचानक एक तरुणी वी लव्ह यू म्हणून ओरडली.  

नेमकं झालं असं की, विराट आणि अनुष्काला भेट आणि आशिर्वाद दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी उभे राहिले. त्याचवेळी खाली उभ्या असलेल्या पाहुण्यांपैकी एका तरुणी ओरडली - सर वी लव्ह यू. तरुणीचा आवाज ऐकल्यानंतर मोदांनीही हसून हात हलवत प्रतिक्रिया दिली. हा व्हिडीओ कॅमे-यात कैद झाला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विराट हा मुळचा दिल्लीचा असल्यामुळे त्याच्या या सोहळ्यात मित्रमंडळींनी मोठ्याप्रमाणात हजेरी लावली होती. तसेच, विराट आणि अनुष्काच्या कुटुंबातले सर्व नातेवाईकही हजर होते. या रिसेप्शन सोहळ्यादरम्यान विराट आणि अनुष्काने पारंपरिक पोशाख केला होता. विराटने ब्लॅक शेरवानी घातली होती, तर अनुष्काने लाल रंगाची जरीकाम केलेली साडी परिधान केली होती. 

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा 11 डिसेंबरला विवाहबंधनात अडकले. इटलीमधील टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो या रिसॉर्टमध्ये विरुष्काचा विवाहसोहळा पार पडला. आता विराट आणि अनुष्काच्या विवाहानिमित्त दुसरा रिसेप्शन सोहळा 26 डिसेंबरला मुंबईत संपन्न होणार आहे. मुंबईत होणाऱ्या या रिसेप्शनला बॉलिवूड व क्रीडा विश्वातील अनेक दिग्गज हजर राहण्याची शक्यता आहे. हा सोहळा मुंबईतील अॅस्टर बॉलरुम, सेट रेगिस, लोअर परेल येथे ग्रॅण्ड रिसेप्शन होईल. या रिसेप्शनच्या निमंत्रण पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या रिसेप्शन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकांची थीम पर्यावरणाशी निगडीत आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीVirushkaविरूष्काVirushka Weddingविरूष्का वेडिंगVirat Kohliविराट कोहलीAnushka Sharmaअनुष्का शर्मा