Video: महिलेवर पिटबुल कुत्र्याचा हल्ला; लोक सोडवण्याचा प्रयत्न करत राहिले, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 15:05 IST2025-09-05T15:05:12+5:302025-09-05T15:05:34+5:30
या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Video: महिलेवर पिटबुल कुत्र्याचा हल्ला; लोक सोडवण्याचा प्रयत्न करत राहिले, पण...
भारतात गेल्या काही दिवसांपासून कुत्र्यांचा मुद्दा चर्चेत आहे. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच भटक्या कुत्र्यांबद्दल अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मात्र, अद्याप याबाबत ठोस पाऊले उचलली गेली नाहीत. अशातच, सोशल मीडियावर एका पिटबुल कुत्र्याने महिलेवर हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील झाशीतील आहे. शनिवारी संध्याकाळी हेमलता नावाची महिला तिच्या मैत्रिणीच्या घरी काही सामान घेण्यासाठी गेली होती. तिने घराचे गेट वाजवताच पाळीव पिटबुलने महिलेवर हल्ला केला. पिटबुलच्या मालकाने महिलेला सोडण्याचा खूप प्रयत्न केला, पण कुत्रा काही केल्या ऐकत नव्हता. सुमारे 5 मिनिटे कुत्र्याने निर्दयीपणे महिलेचा चावा घेतला.
कुत्तो के प्रेमियों को ये वीडियो भेज दो
— chandan (@chandan_stp) September 5, 2025
झांसी : 55 वर्षीय महिला पर पिटबुल का हमला
5 मिनट तक नोचता रहा#Jhansi#DogAttack#CCTVFootagepic.twitter.com/TFSkatdluE
पिटबुलने या ५५ वर्षीय महिलेवर हल्ला करताच ती जमिनीवर पडली. पिटबुलच्या मालकाने महिलेला कुत्र्यापासून सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो कुत्रा काही केल्या ऐकत नव्हता. कुत्र्याने पूर्ण जोर लावून महिलेला फाडण्याचा प्रयत्न केला. महिला मदतीसाठी मोठ्याने ओरडत होती. आवाज ऐकून महिलेची मुलगी आणि इतर लोकांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण कुत्रा बराच वेळ महिलेचा हात चावत राहिला.
शेवटी कुत्र्याने महिलेचा हात सोडला. या घटनेनंतर संपूर्ण कॉलनीत घबराटीचे वातावरण आहे. हा संपूर्ण प्रकार घरात बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सध्या जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.