शहरं
Join us  
Trending Stories
1
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
2
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
3
Malegaon Blast Case Verdict: प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
4
बदला घ्यायला आली...! नागाला चुकून मारलेले, नागीण नाग पंचमीच्याच दिवशी घरात आली...
5
कोण आहेत कर्नल पुरोहित? ज्यांना मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सोडलं; ९ वर्ष जेलमध्ये टॉर्चर केले
6
खाजगी बँकेचा UPI ला धक्का? आता प्रत्येक व्यवहारावर लागणार शुल्क, 'या' तारखेपासून नवा नियम लागू!
7
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
8
KBC चा पहिला करोडपती आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा नवरा, 'कमळी' मालिकेत साकारतेय भूमिका
9
जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश 'या' ५ देशांकडून करतोय मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी! कारण काय?
10
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"
11
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अमेरिकेचा भारतावर 'टॅरिफ बॉम्ब'! आता iPhone महागणार, 'मेक इन इंडिया'ला मोठा धक्का!
13
'भारत-रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्था आणखी बुडवणार...', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले
14
"तो एकदम छपरी आहे...", अहान पांडेबद्दल हे काय बोलून गेला 'सैयारा'चा दिग्दर्शक मोहित सुरी
15
२ ऑगस्टला जग अंधारात बुडणार नाही; दा. कृ. सोमण यांचे स्पष्टीकरण
16
ट्रम्प यांच्या २५% टॅरिफच्या घोषणेनंतर भारतातील 'हे' शेअर्स जोरदार आपटले; विकण्यासाठी रांग, तुमच्याकडे आहेत?
17
ठाण्यात राजकीय वातावरण तापले; राजन विचारे यांच्या बॅनरवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जुंपली
18
अहो आश्चर्यम! गर्भाशयात नाही, लिव्हरमध्ये वाढतंय बाळ; काय आहे इंट्राहेपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी?
19
कौतुक करता-करता कर लादला; ट्रम्प यांच्या 25% टॅरिफवरुन विरोधकांचा मोदी सरकारवार निशाणा
20
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव

Video : 25 वर्षे आमदार असताना काय केले? तरुणाच्या माजी मुख्यमंत्र्यांनी कानशिलात लगावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 12:52 IST

काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री राजिंदर कौर भट्ठल या पंजाबच्या पहिल्याच महिला मुख्यमंत्री होत्या. 1992 ते 2017 पर्यंत त्या आमदार होत्या. 2017 मध्ये त्या पराभूत झाल्या होत्या.

संगरूर (पंजाब)  : लोकसभा, विधानसभेमध्ये निवडून गेलेल्या उमेदवाराला त्याने काय काम केले हे विचारणे मतदाराचे आद्य कर्तव्य आहे. मात्र, पंजाबमध्ये असे विचारणाऱ्या तरुणालाच माजी मुख्यमंत्री राहिलेल्या महिला नेत्याने कानाखाली लगावल्याचा प्रकार नुकताच घडला. यावरच न थांबता त्या तरुणाला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फरपटत दुसऱ्या बाजुला नेले. 

काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री राजिंदर कौर भट्ठल या पंजाबच्या पहिल्याच महिला मुख्यमंत्री होत्या. 1992 ते 2017 पर्यंत त्या आमदार होत्या. 2017 मध्ये त्या पराभूत झाल्या होत्या. राजिंदर कौर या काँग्रेसचे उमेदवार केवल सिंह ढिल्लों यांच्या प्रचारासाठी रविवारी बुशैहरा गावात आल्या होत्या. यावेळी एका युवकाने त्यांना प्रश्न विचारायचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गप्प बसविले. मात्र, तरुणाने पुन्हा प्रश्न विचारताच राजिंदर कौर यांचा पारा चढला. त्यांन थेट त्या युवकाच्या कानशिलातच भडकाविली आणि प्रचारसभेतून तडक बाहेर पडल्या. 

राजिंदर कौर मंचावर आल्या होत्या यावेळी त्या युवकाने त्यांना तुम्ही या भागाच्या विकासासाठी काय केले, असा प्रश्न विचारला. य़ावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना नंतर विचार असे सांगत शांत बसविले. प्रचारसभा झाल्यावर राजिंदर सिंह जायला लागल्या तेव्हा या तरुणाने, 'तुम्ही गेली 25 वर्षे या भागातील आमदार आहात, या काळात काय विकास केला?', असा प्रश्न विचारला. यावर राजिंदर कौर नाराज झाल्या. या युवकाचे नाव कुलदीप असे आहे. 

याचवेळी कुलदीपने त्यांना रोजगाराविषयीही विचारले, यावर त्या मंचावरून खाली येत कुलदीरच्या कानाखाली मारली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कुलदीपला बाजुला नेले. वातावरण तापल्यानंतर तेथील लोकांना काँग्रेस उमेदवार, रोजिंदर कौर यांच्याविरोधात घोषणाबाजी देण्य़ास सुरुवात केली. यावर राजिंदर कौर यांनी आपवर आरोप केले आहेत. प्रचारामध्ये बाधा निर्माण करण्यासाठी आप तरुणांना वापरत आहे. त्यांच्या मनामध्ये काहीही भरविले जात आहे. 

टॅग्स :Punjab Lok Sabha Election 2019पंजाब लोकसभा निवडणूक 2019sangrur-pcसंगरूरcongressकाँग्रेस