Video - तुफान राडा! एकाच बॉयफ्रेंडसाठी 2 तरुणी भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 08:36 IST2022-07-14T08:30:29+5:302022-07-14T08:36:38+5:30

एकाच बॉयफ्रेंडवरून दोन तरुणींमध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्याच्यासाठी त्या भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला आहे.

Video two girls fight on road for one boyfriend dragged by holding hair attacked with sticks haldwani | Video - तुफान राडा! एकाच बॉयफ्रेंडसाठी 2 तरुणी भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन्...

Video - तुफान राडा! एकाच बॉयफ्रेंडसाठी 2 तरुणी भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन्...

नवी दिल्ली - प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. अनेकदा त्यांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से हे समोर येत असतात. काही वेळा एकाच तरुणीवर किंवा मग एकाच तरुणावर खूप जणांचा जीव जडतो. मग अशावेळी त्या व्यक्तीला मिळवण्यासाठी नानाविध उपाय केले जातात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एकाच बॉयफ्रेंडवरून दोन तरुणींमध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्याच्यासाठी त्या भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडच्या हल्दानीतील हीरा नगर परिसरात ही भयंकर घटना घडली आहे.  एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींमध्ये जुंपली आहे. भररस्त्यात तरुणींची तुंबळ हाणामारी झाली आहे. दोघीही रस्त्यातच आपापसात भिडल्या. त्यांनी एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, लाठ्याकाठ्यांनी एकमेकींना बदडूनही काढलं. तरुणींच्या मारहाणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये काही मुली रस्त्यावर आहेत. यामध्ये तरुणींचे दोन गट असल्याचं पाहायला मिळतं. एकाच बॉयफ्रेंडवरून त्या एकमेकींशी आधी भांडण करतात, शिवीगाळ करतात. त्याचवेळी एक तरुणी रस्त्यावर पडलेली काठी घेते आणि त्या काठीने दुसऱ्या तरुणीला मारते. त्यानंतर तरुणी एकमेकींचे केस ओढतात. उत्तराखंडच्या हल्द्वानीतील हिरानगरच्या पोलीस योगा पार्कातील ही घटना आहे. घटनेच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही लोकांनी हे भांडण सो़डवण्याचा प्रयत्न केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Video two girls fight on road for one boyfriend dragged by holding hair attacked with sticks haldwani