Video : विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीला ट्रक्टर धावला, व्हिडिओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 12:45 PM2021-10-12T12:45:28+5:302021-10-12T12:46:23+5:30

सोमवारी रात्री बंगळुरूत मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे बंगळुरू विमानतळ परिसराला तलावाचं रुप प्राप्त झालं होतं. येथील कॅम्पेगौडा इंटरनॅशनल विमानतळानजीक पाणीच पाणी झाल्याने प्रवासी अकडून पडले होते.

Video : Tractor rushed to the aid of passengers at the airport, video viral on bengluru kampaguda airport in karnataka | Video : विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीला ट्रक्टर धावला, व्हिडिओ व्हायरल 

Video : विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीला ट्रक्टर धावला, व्हिडिओ व्हायरल 

Next
ठळक मुद्देसोमवारी झालेल्या पावासामुळे आयटी नगरीत पाणीच पाणी झाल्याचे दिसून आले. शहरातील काही परिसरात पूरसदृश्य परिस्थिती दिसून आली. त्यामुळे, नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहनही स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले होते

बंगळुरू - कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरू शहरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे, प्रवासात असलेल्या नागरिकांना, प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. वाहनांतून घरापर्यंत किंवा घरापासून इच्छीत ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. येथील कॅम्बेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक पाणी साचल्याने विमान वाहतूक करणाऱ्या प्रवाशांनाही काही तास अडकून पडावे लागल्याचे दिसून आले. 

सोमवारी रात्री बंगळुरूत मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे बंगळुरू विमानतळ परिसराला तलावाचं रुप प्राप्त झालं होतं. येथील कॅम्पेगौडा इंटरनॅशनल विमानतळानजीक पाणीच पाणी झाल्याने प्रवासी अकडून पडले होते. त्यावेळी, प्रवाशांनी स्थानिक ट्रॅक्टर चालकांकडे मदत मागितली. विमानतळ टर्मिनल्स परिसरात पोहोचण्यासाठी ट्रॅक्टरमधून झालेला प्रवाशांचा प्रवास व्हिडिओत कैद झाला आहे. 

सोमवारी झालेल्या पावासामुळे आयटी नगरीत पाणीच पाणी झाल्याचे दिसून आले. शहरातील काही परिसरात पूरसदृश्य परिस्थिती दिसून आली. त्यामुळे, नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहनही स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले होते. दरम्यान, बंगळुरूच्या कोनपन्ना अग्रहारा सीमा परिसरात पावसाच्या पाण्यामुळे शॉर्ट सर्कीट होवून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. शहरात आजही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 
 

Web Title: Video : Tractor rushed to the aid of passengers at the airport, video viral on bengluru kampaguda airport in karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.