उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील एका कोचिंग सेंटरमध्ये शनिवारी अचानक झालेल्या स्फोटामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कादरी गेट पोलीस स्टेशन परिसरातील सतनपूर मंडी रोडवरील एका इमारतीत ही घटना घडली. स्फोट इतका जोरदार होता की छतासह इमारतीचा काही भाग उडून गेला आणि जवळच्या घरांच्या काचा देखील फुटल्या.
कोचिंग सेंटरमध्ये झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला आणि पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्फोटाचे नेमके कारण सध्या समजलेले नाही. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिसराचा तपास सुरू केला आहे.
घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बॉम्ब निकामी पथक आणि फॉरेन्सिक पथकालाही चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे. हा स्फोट गॅस सिलेंडर, शॉर्ट सर्किट किंवा इतर स्फोटक पदार्थांमुळे झाला आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न अधिकारी करत आहेत.
फरुखाबादचे पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचे कारण तपासानंतरच स्पष्ट होऊ शकेल. सध्या परिसरात भीतीचे वातावरण आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहचून वेगाने मदतकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.
Web Summary : A sudden explosion in a Farrukhabad coaching center killed one and injured six. The blast, which occurred near Kadri Gate, caused significant damage. Authorities are investigating the cause, with gas cylinder or explosive material being considered. Chief Minister Yogi Adityanath has directed officials to provide assistance.
Web Summary : फर्रुखाबाद के एक कोचिंग सेंटर में हुए विस्फोट में एक की मौत हो गई, छह घायल। कादरी गेट के पास हुए धमाके से भारी नुकसान हुआ। अधिकारी जांच कर रहे हैं, गैस सिलेंडर या विस्फोटक सामग्री की आशंका है। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने अधिकारियों को सहायता का निर्देश दिया है।