शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

Video - उंचावरुन कोसळणारा हा निसर्गरम्य धबधबा पाहून म्हणाल, व्वा क्या बात है...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 16:37 IST

मुसळधार पावसानंतर शिमोगा येथील जोग धबधबा आकर्षणाचे केंद्र बनला आहे. या धबधब्यावरुन वाहणारे पाणी पाहताना निसर्गाच्या सुंदरतेचे करावे तेवढे कौतूक कमीच, किंवा व्वा क्या बात है,

बंगळुरू - मुसळधार पावसानंतर शिमोगा येथील जोग धबधबा आकर्षणाचे केंद्र बनला आहे. या धबधब्यावरुन वाहणारे पाणी पाहताना निसर्गाच्या सुंदरतेचे करावे तेवढे कौतूक कमीच, किंवा व्वा क्या बात है, असे म्हटल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीत. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमारेषेवरील शरावती नदीवर हा धबधबा आहे. सध्या या धबधब्यातून वाहणाऱ्या पाण्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  

श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून निसर्गरम्य ठिकाणांची मजा लुटण्यासाठी पर्यटक योजना आखत आहेत. तुम्हीही निसर्गरम्य ठिकाणाच्या शोधात असाल, तर कर्नाटकमधील जोग धबधबा तुमचा हौस पूर्ण करु शकतो. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील हा धबधबा सध्या जोरात वाहताना दिसत आहे. त्यामुळे येथे पर्यटक गर्दी करत असून आहेत. नैसर्गिक सौंदर्यासोबतच हा धबधबा दोन्ही राज्यातील नागरिकांच्या आर्थिक मदतीचेही केंद्र बनले आहे. या धबधब्यातून खाली पडणारे पाणी साबणाच्या फेसाप्रमाणे असून पर्यटकांना अल्हादायक गारवा देते. या धबधब्याजवळ वीजनिर्मित्तीसाठीची मोठी यंत्रणा तयार करण्यात आली आहे. या निसर्गरम्य ठिकाणाचे मूळ नाव हे जोग प्रपात असून जोगाड गुंडीचे हे इंग्रजी नाव आहे. जेरसप्पा नावाच्या एका प्रदेशाचाच हा एक भाग आहे. त्यामुळे या जोग धबधब्याला जेरसप्पा धबधबाही म्हणतात. जोग धबधबा हा देशातील सर्वात उंचावरुन पाणी कोसळणारा द्वितीय क्रमांकाचा धबधबा आहे. तर मेघालयातील नोहकलिकाई हा देशातील क्रमांक एकचा धबधबा आहे.

पाहा व्हिडिओ - 

 

टॅग्स :WaterपाणीKarnatakकर्नाटकShravan Specialश्रावण स्पेशलRainपाऊस