बिहार - बिहारमधील सिवान येथे पोलीस अधिकाऱ्याकडून घडलेल्या क्षुल्लक चुकीमुळे त्याला निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. बिहारचे आरोग्य मंत्री मंगल पांडे हे सिवान येथील रुग्णालयाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. तेथे कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. त्यातच हा गोंधळ उडाला. पोलीस ताफ्यातील एक पोलीस अधिकाऱ्याने मंगल पांडे यांना ओळखले नाही. अधिकाऱ्याने त्यांच्याकडे पाहून चौकशी करण्याचा प्रयत्न केला. त्यावर आरोग्य मंत्री यांचा संताप अनावर झाला आणि त्याने थेट त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्याचे निलंबनाची मागणी केली आहे.
Video : मंत्र्याची चुकून चौकशी करणं पोलीस अधिकाऱ्याला पडली महागात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 16:15 IST
आरोग्य मंत्री यांचा संताप अनावर झाला
Video : मंत्र्याची चुकून चौकशी करणं पोलीस अधिकाऱ्याला पडली महागात
ठळक मुद्देबिहारचे आरोग्य मंत्री मंगल पांडे हे सिवान येथील रुग्णालयाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी गेले होते.त्यांनी थेट त्या पोलीस अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणीच केली.