Video : लोकसभेत 'कवी इज बॅक'... ओम बिर्ला यांच्या अभिनंदनासाठी रामदास आठवलेंची खास कविता
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 13:47 IST2019-06-19T13:47:11+5:302019-06-19T13:47:28+5:30
ओम बिर्ला यांना एनडीएसह, तृणमूल आणि काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे.

Video : लोकसभेत 'कवी इज बॅक'... ओम बिर्ला यांच्या अभिनंदनासाठी रामदास आठवलेंची खास कविता
नवी दिल्ली - केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंनी आपल्या हटके कवीस्टाईलनेच लोकसभा अध्यक्षांचे स्वागत आणि अभिनंदन केले. राजस्थानमधील कोटाचे खासदार ओम बिर्ला यांनी लोकसभेचे अध्यक्ष म्हणून पदभार स्विकारला. लोकसभेचे 16 वे अध्यक्ष म्हणून सुमित्रा महाजन यांनी कार्यभार सांभाळला होता. त्यानंतर, 17 व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून आज ओम बिर्ला यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
ओम बिर्ला यांना एनडीएसह, तृणमूल आणि काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिर्ला यांच्या निवडीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर, बिर्ला यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बिर्ला यांच्या निवडीनंतर मोदींसह विविध पक्षांच्या प्रमुखांनी त्यांचे अभिनंदन केले. तर, रामदास आठवलेंनी त्यांच्या स्टाईलने कविता सादर करत ओम बिर्ला यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी, सभागृहात मोठा हशा पिकला होता. रामदास आठवलेंच्या कवितेवेळी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हसून दाद दिली. तर, युपीएच्या प्रमुख सोनिया गांधींही मन लाऊन ऐकत होत्या.
आठवलेंची कविता...!
एक देश का नाम है रोम
और लोकसभा के स्पीकर बन गए है बिर्ला ओम
लोकसभा का आपको अच्छी तरह चलाना है काम
वेल मे आने वालो का ब्लॅक लिस्ट में डालना है नाम
नरेंद्र मोदी और आपका दिल है विशाल
राहुलजी आप अब रहो खुशहाल
हम सब मिलकर हात मे लेते है एकता की मशाल
भारत को बनाते है और भी विशाल
आप का राज्य है राजस्थान
लोकसभा की आप बन गए है जान
भारत की हमे बढानी है शान
लोकसभा चलाने के लिए आप जैसा परफेक्ट है मॅन
लोकसभेत रामदास आठवलेंची कविता...! pic.twitter.com/cL8SS1UpcO
— Lokmat (@MiLOKMAT) June 19, 2019