Video - पिटबुल लचके तोडत होता अन् कुटुंब पाहत राहिलं; काळीज पिळवटून टाकणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 11:15 IST2023-11-05T10:55:35+5:302023-11-05T11:15:39+5:30

पिटबुल कुत्र्याला घराबाहेर शौच करण्यापासून रोखण्यासाठी ही महिला तिच्या शेजारच्या कुटुंबाकडे गेली होती. ही संपूर्ण घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Video pitbull dog attack on woman video viral in delhi | Video - पिटबुल लचके तोडत होता अन् कुटुंब पाहत राहिलं; काळीज पिळवटून टाकणारी घटना

फोटो - आजतक

दिल्लीतील स्वरूप नगर पोलीस स्टेशन हद्दीतील गल्ली क्रमांक 14 मध्ये राहणाऱ्या एका महिलेला तिच्या शेजारच्यांच्या पिटबुल कुत्र्याने हल्ला करून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिटबुल कुत्र्याला घराबाहेर शौच करण्यापासून रोखण्यासाठी ही महिला तिच्या शेजारच्या कुटुंबाकडे गेली होती. ही संपूर्ण घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जखमी महिलेवर उपचार सुरू आहेत. महिलेने शेजारच्या कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते 9 च्या दरम्यान दिल्लीच्या स्वरूप नगर पोलीस स्टेशन परिसरात घडली. स्वरूप नगर परिसरातील 14 क्रमांकाची गल्ली आहे. येथे राहणाऱ्या रिया देवी हिने पाहिले की, शेजारच्या कुटुंबातील एक महिला रियाच्या घरासमोर शौच करण्यासाठी तिच्या पिटबुल कुत्र्याला घेऊन येते. याबाबत रिया शेजारच्या महिलेकडे तक्रार करायला गेली. 

समोर आलेल्या घटनेच्या व्हिडिओमध्ये रिया तिच्या शेजाऱ्याच्या घरासमोर उभी असल्याचे दिसत आहे. यावरून दोन महिलांमध्ये वाद सुरू आहे. पिटबुल कुत्रा त्यावेळी रस्त्यावर फिरत आहे. याच दरम्यान, दोन महिला भांडताना पाहून एक मुलगा त्यांच्या जवळ जाऊन उभा राहतो. पिटबुल मुलाच्या पायाला चावण्याचा प्रयत्न करतो. मुलगा घाबरून मागे जातो. यानंतर घराच्या दारात उभी असलेली महिला रियाजवळ येऊन उभी राहते. पिटबुल कुत्रा त्याच्या मालकाकडे येतो. मग अचानक तो रियाकडे जातो आणि तिच्यावर हल्ला करतो.

शेजारच्या कुटुंबातील एक मुलगी बाहेर येऊन पिटबुल पकडते. त्यानंतर रिया कुत्र्यावर दगडफेक करते. कुत्रा मुलीच्या हातातून स्वतःची सुटका करून घेतो आणि पुन्हा रियावर हल्ला करतो. काही जण त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात पण तो ऐकत नाही. पिटबुलने रियाला अनेक ठिकाणी चावा घेतला आहे. व्हिडिओमध्ये रियाचा जखमी हात दिसत आहे.

पोलिसांनी दाखल केला गुन्हा 

पिटबुलच्या हल्ल्यामुळे रियाच्या शरीरावर पाच ठिकाणी जखमा झाल्याचं सांगण्यात येत आहे. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याचदरम्यान, तिने शेजारच्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शेजारच्या महिलेने मुद्दाम तिच्या कुत्र्याला सोडल्याचा आरोप रियाने केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत. 
 

Web Title: Video pitbull dog attack on woman video viral in delhi

टॅग्स :delhiदिल्ली