Video: पाकिस्तानच्या नापाक कृत्याचा भारतीय लष्कराने केला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 09:41 IST2019-09-10T09:39:37+5:302019-09-10T09:41:23+5:30

नियंत्रण रेषेनजीकच्या संशयित हालचाली वाढल्या असून घुसखोरीचे प्रयत्न वारंवार केले जात आहेत.

Video: Pakistani Border Action Team Infiltration Video Released By Indian Army | Video: पाकिस्तानच्या नापाक कृत्याचा भारतीय लष्कराने केला पर्दाफाश

Video: पाकिस्तानच्या नापाक कृत्याचा भारतीय लष्कराने केला पर्दाफाश

नवी दिल्ली: जम्मू- काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाल्याचे अनेकदा दिसून आले आहे. तसेच नियंत्रण रेषेनजीकच्या संशयित हालचाली वाढल्या असून घुसखोरीचे प्रयत्न वारंवार केले जात आहेत. मात्र भारतीय लष्कर असे प्रयत्न हाणून पाडत आहे. त्यातच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतात घुसखोरीचा प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याचा व्हिडिओ भारतीय लष्कराकडून सोमवारी प्रसिद्ध करुन पाकिस्तानच्या नापाक कृत्याचा भारतीय लष्कराने पर्दाफाश केला आहे.

किस्तानच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीमने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये एलओसीवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय लष्कराने पाकिस्तानचा हा कट हाणून पाडला. तसेच चार ते पाच दहशतवाद्यांचा खात्मा देखील करण्यात आल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येते.

तसेच गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान नियंत्रण सीमेवर सातत्याने शस्त्रससंधीचं उल्लंघन करत असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर अधिकच सर्तक असून पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या सर्व हालचालींवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. तर दहशतवादी कारवायांची देखील शक्यता वर्तवण्यात आल्याने सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आलेली आहे.

Web Title: Video: Pakistani Border Action Team Infiltration Video Released By Indian Army