Video: तो डान्स ठरला अखेरचा; भाच्याच्या लग्नात नाचताना मामाचा 5 सेकंदात हार्ट अटॅकने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 21:07 IST2022-11-29T21:05:10+5:302022-11-29T21:07:53+5:30

डान्स करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याच्या बातम्या सामान्य झाल्या आहेत.

Video: man dies of heart attack in 5 seconds while dancing at nephew's wedding | Video: तो डान्स ठरला अखेरचा; भाच्याच्या लग्नात नाचताना मामाचा 5 सेकंदात हार्ट अटॅकने मृत्यू

Video: तो डान्स ठरला अखेरचा; भाच्याच्या लग्नात नाचताना मामाचा 5 सेकंदात हार्ट अटॅकने मृत्यू


डान्स करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या बातम्या सामान्य झाल्या आहेत. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून ताजे प्रकरण समोर आले आहे. येथे पिपलानी कटरा परिसरात एका लग्न समारंभात नाचत असताना अचानक हृदयविकाराचा झटका येऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

25 नोव्हेंबरला मनोज विश्वकर्मा (40) हे आपल्या भाच्याच्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील पिपलानी कटरा येथे आले होते. यावेळी लग्नात नाचत असताना ते अचानक कोसळले. व्हायरल व्हिडिओमध्ये मनोज विश्वकर्मा आपल्या कुटुंबीयांसह ढोल-ताशांच्या तालावर जोमाने नाचताना दिसत आहे. काही सेकंदात ते अचानक खालीपडतात. 

घटना घडली त्यावेळी महिला तिथे उपस्थित होत्या. यावेळी उभे असलेले कुटुंबीय त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांचा मृत्यू होतो. मनोज यांच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबावर शोककळा पसरली. या घटनेनंतर मनोजला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, परंतु येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डान्सदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी अनेकदा अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत. 

Web Title: Video: man dies of heart attack in 5 seconds while dancing at nephew's wedding