Video - "मी GPS लावला होता..."; हॉटेलमध्ये बायकोला रंगेहाथ पकडल्यावर ढसाढसा रडला नवरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 13:10 IST2025-12-16T13:10:02+5:302025-12-16T13:10:28+5:30
१५ वर्षांपासून विवाहित असलेल्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीला हॉटेलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबत पकडलं.

Video - "मी GPS लावला होता..."; हॉटेलमध्ये बायकोला रंगेहाथ पकडल्यावर ढसाढसा रडला नवरा
पंजाबच्या अमृतसरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १५ वर्षांपासून विवाहित असलेल्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीला हॉटेलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबत पकडलं. धक्कादायक बाब म्हणजे, ही पहिली वेळ नव्हती. यापूर्वीही पत्नीला याच प्रकारे हॉटेलमध्ये पकडण्यात आलं होतं, तरीही कुटुंबाने हे नातं वाचवण्याचा प्रयत्न केला होता.
पती रवी गुलाटी यांनी सांगितलं की, त्यांचं लग्न २५ एप्रिल २०१० रोजी हिमानीसोबत झालं होतं. २०१८ मध्ये देखील त्याच्या पत्नीला एका हॉटेलमध्ये दुसऱ्या कोणासोबततरी पकडलं गेलं होतं. त्यावेळी पत्नीच्या आई-वडिलांना बोलावलं. पत्नी आणि तिच्या कुटुंबाने माफी मागितली. मुलांचं भविष्य लक्षात घेऊन रवीने ती चूक माफ केली आणि हे नाते सांभाळण्याचा निर्णय घेतला.
Now she will file false dowry, DV, 125 case on not just husband but his entire family, police will register it happily & court will give her maintenance also because she is abla naari & isolated incidence of adultery doesn't take away her alimony right pic.twitter.com/OHI2AC9orh
— Deepika Narayan Bhardwaj (@DeepikaBhardwaj) December 15, 2025
रवीच्या म्हणण्यानुसार, यावेळी त्यांची पत्नी दुपारी सुमारे ३ ते ३:३० च्या दरम्यान घरातून बाहेर पडली आणि त्यानंतर १५ ते २० वेळा कॉल करूनही तिने फोन उचलला नाही. त्याला बऱ्याच काळापासून संशय असल्याने, रवीने तिच्या एक्टिव्हामध्ये GPS ट्रॅकर लावला होता. लोकेशन तपासलं असता, ती एका हॉटेलच्या दिशेने जात असल्याचं दिसलं. रवीने आपलं दुकान बंद केलं आणि जीपीएस सिग्नलचा पाठलाग करत थेट हॉटेल गाठलं.
हॉटेलमध्ये पोहोचल्यावर रवीने आपल्या पत्नीला एका अन्य व्यक्तीसोबत रंगेहाथ पकडलं. रवीचे वडील परवेज गुलाटी यांनी सांगितलं की, ही समस्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. सुमारे पाच ते सात वर्षांपूर्वीही अशाच प्रकारचं प्रकरण समोर आलं होतं. तेव्हा दोन्ही कुटुंबांनी एकत्र बसून चर्चा केली होती. एवढेच नव्हे तर एका आमदाराच्या घरीही समेट घडवून आणण्यासाठी बैठक झाली होती. त्यावेळी हे प्रकरण मिटलं असं वाटलं होतं. हॉटेल रूममध्ये पत्नीला रंगेहाथ पकडल्यावर पती ढसाढसा रडला. "मी GPS लावला होता..." असंही सांगितलं. त्याचा व्हिडीओ आता जोरदार व्हायरल होत आहे.