शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 17:10 IST

कर्नाटकातील काँग्रेसचे आमदार राजू केज हे जुगलतोमध्ये मतदारांना धमकावताना व्हिडिओमध्ये दिसल्याने वादात सापडले आहेत.

लोकसभा निवडणुकीदरम्यान, कर्नाटकातील काँग्रेसचे आमदार राजू केज हे जुगलतोमध्ये मतदारांना धमकावताना व्हिडिओमध्ये दिसल्याने वादात सापडले आहेत. जर पक्षाला मोठ्या मताधिक्याने मतदान केलं नाही तर वीज कापली जाईल असं त्यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा प्रचार करत असताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

काँग्रेसचे आमदार राजू केज या व्हिडिओमध्ये "तुम्ही आम्हाला मत न दिल्यास आम्ही वीज खंडित करू आणि मी माझ्या शब्दांवर ठाम राहीन" असं म्हणताना दिसत आहेत. केज यांनी वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांचा हा व्हि़डीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून अनेक जण त्यावर टीका करत आहेत. 

"140 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात कोणीही पंतप्रधान होणार नाही का? आजचा तरुण म्हणतो, मोदी म्हणजे मोदी आहेत. तुम्ही त्यांच्या मागे का जात आहात?" असा सवाल देखील विचारला होता. याआधी ममदापूरमध्ये एका निवडणूक सभेला संबोधित करताना केज यांनी पंतप्रधान मोदींवर आलिशान जीवन जगत असल्याचा आरोप केला होता.

काँग्रेस आमदारांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना, भाजपाचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. हा पक्ष 'मोहब्बत की दुकान' नाही आणि खरं तर 'धमकी के भाईजान' आहे. तसेच भाजपाने कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचाही संदर्भ दिला. 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४