भाजपाच्या महिला नेत्याकडून अर्वाच्य शिवीगाळ, रस्त्यावरुन जाणाऱ्या व्यक्तीला बदडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 10:40 IST2017-09-19T21:47:23+5:302017-09-20T10:40:16+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ भारत अभियान सध्या भाजपाच्या एका महिला नेत्यामुळे चर्चेत आहे. मध्यप्रदेश मधील एका महिला नेत्यानं अर्वाच्य शिवीगाळ करत रस्त्यावरुन जाणाऱ्या व्यक्तीला बदडले

भाजपाच्या महिला नेत्याकडून अर्वाच्य शिवीगाळ, रस्त्यावरुन जाणाऱ्या व्यक्तीला बदडले
इंदौर, दि. 19 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ भारत अभियान सध्या भाजपाच्या एका महिला नेत्यामुळे चर्चेत आहे. मध्यप्रदेश मधील एका महिला नेत्यानं अर्वाच्य शिवीगाळ करत रस्त्यावरुन जाणाऱ्या व्यक्तीला बदडले आहे. हा व्हिडिओ सध्य सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटिझन्स भाजपावर टीका करत आहेत.
मध्यप्रदेशातील सिवनी शहरातील बस स्थानकात स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांचा स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम सुरु होता. यासाठी सर्व तयारी करण्यात आली होती. बस स्थानक असल्याने परिसरात लोकांची चांगलीच वर्दळ होती. मात्र, याच ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी कार्यक्रम घेण्याचे ठरवल्याने त्यासाठी अभियानाचा फलकही लावण्यात आला होता. त्यापुढे भाजप कार्यकर्त्यांचा स्वच्छता कार्यक्रम सुरु होता. मात्र, सार्वजनिक ठिकाण आणि वर्दळीचे असल्याने त्यांच्या कार्यक्रमस्थळावरून एक पुरुष व्यक्ती पुढे जात असताना भाजपच्या महिला नेत्याचा अचानक पारा चढला. या महिला नेत्याने चक्क त्या पुरुषाला झोडपायला सुरुवात केली.
#WATCH Seoni, MP: Local BJP leader thrashes man during cleanliness drive for asking when she'll clean her own locality (Note: Foul Language) pic.twitter.com/pIj1pMQM9u
— ANI (@ANI) September 19, 2017
यावेळी त्याठिकाणी काही पोलिसही उपस्थित होते. यापैकी एका पोलिसाने संबंधित व्यक्तीला संरक्षण देत महिला नेत्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाईंचा पारा इतका चढला होता की, तिने त्या पुरुषाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळही केली. या प्रकारामुळे स्वच्छता अभियान बाजूला राहिले आणि उपस्थितांची चांगलीच करमणूक झाली. मात्र, सर्वसामान्यांना वेठीस धरुन मारहाण आणि शिवीगाळ केल्यामुळे राजकीय नेते म्हणवून घेणाऱ्या अशा लोकांवर टीकाही होत आहे.