गुजरातच्य़ा जुनागडमध्ये इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली 10-12 जण अडकले, मदतकार्य सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 14:45 IST2023-07-24T14:38:01+5:302023-07-24T14:45:58+5:30

इमारतीच्या खालच्या बाजुला दुकाने आणि मागील बाजूस घरे आहेत. त्यामुळे येथील अनेक जण अडकण्याची भीती आहे. 

Video Gujarat two storeyed building collapsed in Junagadh. Several feared trappe | गुजरातच्य़ा जुनागडमध्ये इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली 10-12 जण अडकले, मदतकार्य सुरू

गुजरातच्य़ा जुनागडमध्ये इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली 10-12 जण अडकले, मदतकार्य सुरू

गुजरातमधील जुनागडमध्ये एक धक्कादायक घटन घडली आहे. एक दुमजली इमारत कोसळली आहे. ढिगाऱ्याखाली 10 ते 12 जण अडकल्याची भीती आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. ही दुर्घटना दुपारी दीडच्या सुमारास घडली आहे. संपूर्ण गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. जुनागडमध्येही यापूर्वी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.

इमारतीच्या खालच्या बाजुला दुकाने आणि मागील बाजूस घरे आहेत. त्यामुळे येथील अनेक जण अडकण्याची भीती आहे. त्यामध्ये दुकानांमध्ये उपस्थित असलेल्या ग्राहकांचाही समावेश असू शकतो. स्थानिक लोकांच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य राबविण्यात येत आहे.

एनडीआरएफची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. येथे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यानंतर एनडीआरएफला तैनात करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे घर जीर्ण झाली होती आणि आता ती कोसळल्याची माहिती मिळत आहे. रुग्णवाहिका देखील घटनास्थळी दाखल झाली आहे.


 

Web Title: Video Gujarat two storeyed building collapsed in Junagadh. Several feared trappe