Delhi Airport Bus Fire:दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-3 वर मंगळवारी (28 ऑक्टोबर) मोठा अपघात टळला. एअर इंडियाच्या ग्राउंड हँडलिंग सेवा पुरवठादार कंपनी AI SATS च्या एका बसमध्ये अचानक आग लागली. सुदैवाने, त्या वेळी बसमध्ये कोणताही प्रवासी नव्हता, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
ही घटना टर्मिनल-3 वरील बे नंबर 32 जवळ घडली. बस विमानाच्या अगदी जवळ उभी असताना अचानक धूर निघू लागला आणि काही क्षणांतच आग भडकली. तत्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्यात यश आले.
सुदैवाने जीवितहानी नाही
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणालाही इजा झाली नाही आणि आसपास उभ्या असलेल्या विमानांना देखील काही नुकसान झालेले नाही. आग लागण्याचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नाही. विमानतळ प्रशासनाने याचा तपास सुरू केला आहे.
भारतातील सर्वाधिक व्यस्त विमानतळ
दिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. येथे तीन टर्मिनल आणि चार रनवे आहेत. दरवर्षी सुमारे 10 कोटी प्रवाशांच्या वाहतुकीची क्षमता या विमानतळात आहे. टर्मिनल-3 हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही उड्डाणांसाठी वापरले जाते.
Web Summary : A bus caught fire at Delhi's IGI Airport Terminal-3 near a plane. Fortunately, no passengers were on board, and no injuries occurred. The cause is under investigation at India's busiest airport.
Web Summary : दिल्ली के आईजीआई एयरपोर्ट टर्मिनल-3 पर विमान के पास एक बस में आग लग गई। सौभाग्य से, कोई यात्री सवार नहीं था, और कोई घायल नहीं हुआ। भारत के सबसे व्यस्त हवाई अड्डे पर कारण की जांच जारी है।